पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली, देशभरात ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक

PM Narendra Modi

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली, देशभरात ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑक्सिजन वाढीच्या प्रगतीचा आणि देशभरातील उपलब्धतेचा आढावा घेतला.

अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना देशभरात पीएसए ऑक्सिजन संयंत्र बसविण्याच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. देशभरात १०००० हून अधिक पीएसए ऑक्सिजन प्लांट्स येत आहेत ज्यात पीएम केअर तसेच विविध मंत्रालये व पीएसयूच्या योगदानाचा समावेश आहे . देशातील सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये पीएमए केर द्वारा योगदान दिले जाणारे पीएसए ऑक्सिजन प्लांट्स उपलब्ध आहेत. पंतप्रधानांना सांगितले गेले की एकदा पंतप्रधान केअरद्वारे येणाऱ्या सर्व पीएसए ऑक्सिजन प्लांट्स कार्यान्वित झाल्या तर ते १ लाखाहून अधिक ऑक्सिजनयुक्त बेडना उपलब्ध होतील .

हे प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावेत आणि यासाठी राज्य सरकारा बरोबर काम करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. ऑक्सिजन प्लांट्सचा आढावा घेण्याबाबत राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क असतो, असे अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना सांगितले.

PM Narendra Modi
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली, देशभरात ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक
  • देशभरात १५०० हून अधिक पीएसए ऑक्सिजन प्लांट्स तयार होत आहेत.
  • पीएमए ऑक्सिजन प्लांट्स द्वारा १ लाखाहून अधिक ऑक्सिजनयुक्त बेडना आधार देईल, या साठी पीएम केअरने योगदान दिले आहे.
  • ऑक्सिजन प्लांट्स लवकरात लवकर कार्यान्वित व्हाव्यात यासाठी पंतप्रधान अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
  • ऑक्सिजन प्लांट्सचे ऑपरेशन व देखभाल याबद्दल रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे पुरेसे प्रशिक्षण याची खात्री कराः पंतप्रधान
  • ऑक्सिजन प्लांट्सचे कार्यप्रदर्शन आणि कार्यपद्धतीचा मागोवा घेण्यासाठी आयओटी सारखी प्रगत तंत्रज्ञान तैनात कराः पंतप्रधान

ऑक्सिजन संयंत्राचे कार्यान्वयन आणि देखभाल करणाऱ्या रुग्णालय कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण सुनिश्चित करण्याचे  पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध आहेत हे सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.या क्षेत्रातील  तज्ञांनी तयार केलेले एक प्रशिक्षण मॉड्यूल आहे आणि ते देशभरातील सुमारे 8,000 लोकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पंतप्रधान म्हणाले की, स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर या ऑक्सिजन संयंत्राची कामगिरी आणि कामकाजाचा मागोवा घेण्यासाठी आपण आयओटीसारखे प्रगत तंत्रज्ञान तैनात केले पाहिजे. ऑक्सिजन प्रकल्पाच्या कामगिरीवर नजर ठेवण्यासाठी आयओटी अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्ज चा वापर करून प्राथमिक तत्वावर प्रकल्प चालविला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली.

या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव, गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *