पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रामार्फत डाळिंब निर्यात करण्याची संधी

कृषी आणि प्रक्रियायुक्त  अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण APEDA-Agricultural And Processed Food Products Export Development Authority हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

Opportunity to export Pomegranate through Irradiation Facility Center of Board of Trade

पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रामार्फत डाळिंब निर्यात करण्याची संधी

पहिली शिपमेंट नुकतीच फ्लोरिडा शहरात रवानाकृषी आणि प्रक्रियायुक्त  अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण APEDA-Agricultural And Processed Food Products Export Development Authority हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

पुणे : अमेरीकेने घातलेली निर्यात बंदी उठवल्याने डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधेचा वापर करुन डाळींब निर्यातीची संधी असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निर्यात करावी, असे आवाहन पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक सतिश वाघमोडे यांनी केले आहे.

अपेडा, भारत सरकार, एन. पी.पी.ओ., महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व के. बी.एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेत डाळींब निर्यातीचे नियोजन करण्यात आले असून पहिली शिपमेंट नुकतीच फ्लोरिडा शहरात रवाना करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. एकूण ३३६ बॉक्सेसमधून १ हजार ३४४ किलो भगव्या प्रतीचे डाळिंब हवाई मार्गे पाठविण्यात आले.

निर्यातीसाठीचे माईट वॉश,सोडियम हायपोक्लोराइड प्रक्रिया, वॉशिंग- ड्राईंग प्रक्रिया करुन निश्चित केलेल्या मानांकनानुसार डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

भारतीय डाळिंबामध्ये कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अँटी ऑक्सिडंट असल्याने अमेरिकेत डाळिंबाला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन जास्तीत जास्त उत्पादकांनी या सुविधेचा वापर करावा, असेही श्री. वाघमोडे यांनी कळविले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
मुंबईकरांचा होणारा सत्कार अभिमानाची गोष्ट
Spread the love

One Comment on “पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रामार्फत डाळिंब निर्यात करण्याची संधी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *