परकीय चलनाची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.

Foreign Currency Image

महसूल गुप्तचर संचालनालयाने परकीय चलनाची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश

मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 1.42 कोटी रुपये मूल्याचे परदेशी Foreign Currency Image चलन जप्त केले. महसूल गुप्तचर संचालनालयाने परदेशी चलनाची भारताबाहेर तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

अचूक गोपनीय माहितीच्या आधारे,  इंडिगो विमान क्रमांक 6E 5362 ने जोधपूरहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आलेल्या  आणि 03.12.2021 रोजी दुबईच्या  विमान क्रमांक 6E 61 मध्ये चढणाऱ्या एक व्यक्ती  शे. करण सिंहा याला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या  मुंबई क्षेत्रीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडवले.

या व्यक्तीच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या कपड्यांमध्ये पांढऱ्या रंगाचे लिफाफे लपवल्याचे आढळून आले.हे लिफाफे उघडले असता विविध मूल्यांचे विदेशी चलन त्यात आढळून आले.जप्त केलेल्या विदेशी चलनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-

अशा प्रकारे एकूण 1,32,000/- मूल्याचे अमेरिकी डॉलर्स, 42,150/-मूल्याचे युरो, 29,500/- मूल्याचे सौदी अरेबियन रियाल आणि 6,00,000/-मूल्याचे जपानी येन असे एकूण 1,42,75,018 रुपयांचे परकीय चलन 1962 च्या सीमाशुल्क कायद्याच्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आले.

करण सिंहला 04.12.2021 रोजी अटक करण्यात आली. त्याला माननीय मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले आणि त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

तपासादरम्यान, लेखराज मेवारा याने हे सामान करण सिंहला दिल्याचे समोर आले. त्यानंतर लेखराजला 05.12.2021 रोजी अटक करण्यात आली आणि त्याला माननीय मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे उघडकीला आलेली, मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परकीय चलनाच्या तस्करीच्या प्रयत्नाची एका आठवड्याच्या कालावधीतील ही दुसरी घटना आहे.

यापूर्वी महसूल गुप्तचर संचालनालयाने  26.11.2021 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे 5 लाख अमेरिकी डॉलर्स  जप्त जप्त करून 4 जणांना अटक केली होती.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *