पर्यटन सर्किट ट्रेन चालविण्यासाठी राखीव डबे भाड्याने देण्याचे रेल्वेचे नियोजन.

Indian Railways. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.

रेल्वे आधारित पर्यटन लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इच्छुकांना सांस्कृतिक, धार्मिक आणि अन्य पर्यटन सर्किट ट्रेन चालविण्यासाठी कोचिंग स्टॉक (राखीव डबे) भाड्याने देण्याचे रेल्वेचे नियोजन.


धोरण आणि नियम व अटी तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ईडी स्तरीय समिती केली स्थापन. Indian Railways

पर्यटन क्षमतांचा लाभ घेण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मुख्य क्षमतांना चालना देणे, जसे की पर्यटन उपक्रमांमध्ये विपणन, आदरातिथ्य, सेवांचे एकत्रीकरण, ग्राहकांशी संपर्क, पर्यटकांच्या संपर्काचा विकास करण्यासाठी इच्छुकांना सांस्कृतिक, धार्मिक आणि अन्य पर्यटन सर्किट ट्रेन चालविण्यासाठी कोचिंग स्टॉक (राखीव डबे) भाड्याने देण्याच्या माध्यमातून रेल्वे आधारित पर्यंटन लोकांपर्यंत पोहोचविण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.

प्रस्तावित प्रकल्पासाठीची प्रमुख वैशिष्ट्ये :-

  • इच्छुकांनी केलेल्या रचनेच्या मागणीनुसार डबे भाड्याने देणे. बेअर शेल्स देखील भाड्याने दिले जाऊ शकतात. डब्यांची सरसकट खरेदी करता येऊ शकते.
  • डब्यांच्या किरकोळ नूतनीकरणाला परवानगी आहे.
  • कमीतकमी 5 वर्षांच्या काळासाठी भाडेपट्टा करार होईल आणि तो डब्यांच्या साधारण आयुर्मानापर्यंत वाढविता येईल. 
  • भाडेतत्त्वासाठी रेल्वेची कमीत कमी रचना मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात येईल.
  • इच्छुक व्यवसाय मॉडेल (मार्ग, प्रवास, दर इत्यादी) विकसित करू शकतात /ठरवू शकतात.
  • वाहतूक शुल्क आकारणी, नाममात्र स्टॅबलिंग शुल्क आकारणी, भाडेपट्टा शुल्क आकारणी भारतीय रेल्वे करेल (सरसकट भाडेपट्टा आकार नाही)

अन्य वैशिष्ट्ये :

  • वक्तशीरपणाला प्राधान्य
  • डब्यांचे नूतनीकरण आणि प्रवासासाठी वेळोवेळी मंजुरी
  • देखभालीसाठी वाहतूक शुल्क नाही
  • ट्रेनमध्ये त्रयस्थ जाहिरातींना परवानगी आहे, ट्रेनचे ब्रँडिंग करण्यास परवानगी आहे

रेल्वे मंत्रालयाने धोरण आणि नियम व अटी तयार करण्यासाठी कार्यकारी संचालक स्तरीय समिती स्थापन केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *