‘Government at your door’ initiative in Parvati Constituency
पर्वती मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम![Get certificates, certificates, benefits of various schemes through Mahashibir at less efforts दाखले, प्रमाणपत्रे, विविध योजनांचा लाभ महाशिबिराच्या माध्यमातून मिळवा कमी सायास हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News](data:image/svg+xml,%3Csvg%20xmlns='http://www.w3.org/2000/svg'%20viewBox='0%200%20300%20150'%3E%3C/svg%3E)
पुणे : पर्वती विधानसभा मतदार संघ अंतर्गत ५ जुन २०२३ रोजी ग्लोबल हॉस्पिटल समोरील अग्रवाल शाळा दत्तवाडी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाला आमदार माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत.
विविध शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी एकत्र येवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. अभियांनातर्गत नागरिकांना विविध योजनांची माहिती पोहोचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे, योजनेचा आणि सेवेचा प्रत्यक्ष लाभ देणे आदी कामे करण्यात येतील.
नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार राधिका हावळ- बारटक्के यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com