पुणे महानगरपालिकेने शहरात इलेक्ट्रिक वाहन अंगीकार करणेसाठी इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) सेलची स्थापना.
पुणे शहरातील वाढती लोकसंख्या व वैयक्तिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने, पुणे शहरातील गतिशीलता सुधारणे, विशेषतः सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे व प्रदूषण कमी करणे हे पुणे महानगरपालिके समोर आव्हान आहे. महाराष्ट्र शासनातर्फे “महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१” जाहीर करण्यात आली असून, राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या जास्तीत जास्त वापर वाढावा यासाठी शहरांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या धोरणामध्ये प्राधान्यक्रमाने महाराष्ट्रातील सहा शहरांपैकी पुणे शहराचा देखील समावेश आहे. सदर “महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१” नुसार सार्वजनिक वाहतूकमध्ये २५% विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
EV रेडीनेस प्लॅन तयार करण्यासाठी व शहरात इलेक्ट्रिक वाहनांचा जलदगतीने वापर करण्याची सुविधा देणारी एक सुव्यवस्थित शासन व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळे शहरात एक सतत ईव्ही ट्रांझिशन करण्यासाठी महापालिका आयुक्त, विक्रम कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एक ईव्ही सेलची स्थापन करण्यात आली आहे ईव्ही सेलच्या स्थापनेद्वारे भागधारकांसह आणि इतर संबंधित विभागांशी मिळून काम करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, ज्यावर योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले जाईल.
पुणे महानगरपालिकेने दि.१३ ऑक्टोबर २०२१ रोजी डॉ.कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) यांच्या अध्यक्षतेखाली ईव्ही सेल स्थापनेनंतर कार्यसमूहाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस पुणे मनपाचे मुख्य अभियंता(प्रकल्प)विभाग, पर्यावरण, पथ, विद्युत, विकास योजना, मुख्य लेखा व वित्त विभाग, भू – संपादन, व्हेईकल डेपो या विभागांचे अधिकारी व इतर शासकीय विभाग /कार्यालय जसे पी.एम.पी.एम.एल, पुणे मेट्रो, स्मार्ट सिटी, CIRT, आर. टी. ओ, ट्रफिक पोलीस, MSEDCL व MCCIA, GIZ, रॉकी माउंटन इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये कार्यसमूहातील सर्व विभागांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या तसेच पुणे शहर EV तयार करण्यासाठी स्वीकारल्या जाऊ शकणाऱ्या कृती योजनेचा मसुदा तयार करणे यावर चर्चा करण्यात आली. या पुढीचे पाऊल म्हणून इव्ही सेलच्या संरचनेवर आणि कार्यक्षमतेवर अभिप्राय आणि सूचना मागवण्यासाठी दि.२२ ऑक्टोबर २०२१ रोजी EV industry meet चे आयोजन करणार आहे.
इलेक्ट्रिक मोबिलिटी उपक्रमाचा एक भाग म्हणून, पुण्याने चालू असलेल्या ब्लूमबर्ग फिलांथ्रोपीज ग्लोबल मेयर्स चॅलेंज, २०२१ मध्ये देखील भाग घेतला आहे. जगातील एकूण ६३१ शहरांनी ग्लोबल मेयर्स चॅलेंजमध्ये भाग घेतला होता आणि सर्वात नाविन्यपूर्ण शहरी सोल्यूशनसाठी निवडलेल्या पहिल्या ५० चॅम्पियन शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे. या ५० शहरांपैकी १५ शहरे विजेते म्हणून घोषित होणार आहे. विजेते शहरांना यशस्वी कल्पनांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येकी एक दशलक्ष डॉलर्स जिंकतील.
इलेक्ट्रिक वाहन अंगीकार करण्याला गती देण्यासाठी “Electric Vehicle Cell” गठीत करणारे पुणे शहर हे भारतातील पहिले शहर आहे. भागधारकांच्या सहकार्याने प्रयत्नांनी त्यांच्या उपस्थिती आणि स्थानिक पातळीवर एक सुव्यवस्थित शासन व्यवस्था महाराष्ट्र राज्य EV धोरणांतर्गत निर्धारित लक्ष्य साध्य करण्यासाठी पुण्याला मदत करेल. यामुळे शाश्वत भविष्यासाठी इतर भारतीय शहरांना त्यांच्या विद्यमान ईव्ही इकोसिस्टेमला स्वच्छ ऊर्जा संक्रमण मजबूत करण्यास मदत करू शकते.