पुणे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पुरग्रस्तांसाठी २ कोटीं १ लाख रुपयांचा निधीचा धनादेश
पुणे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पुरग्रस्तांसाठी २ कोटीं १ लाख रुपयांचा निधीचा धनादेश मा.उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा श्री.अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला !
महाराष्ट्रातील विविध भागात महापुराने नुकसान झालेल्या भागासाठी आर्थिक मदत म्हणून पुणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्याकडे २ कोटी १ लाख रुपयांचा धनादेश मा.महापौर मुरलीधर मोहोळ याच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी मा. आमदार भीमराव तापकीर, मा. आमदार माधुरीताई मिसाळ, मा.उपमहापौर सौ. सुनीताताई वाडेकर, मा. विभागीय आयुक्त सौरभ राव , मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मा. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ज्ञानेश्वर मोळक , मा. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मा. उपायुक्त (सामान्य प्रशासन) सुनील इंदलकर, मा मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती उल्का कळसकर, मा. मुख्य कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर, पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष प्रदीप महाडिक, आशिष चव्हाण, अजय उमांदे, गोपाळ चव्हाण इत्यादी उपस्थित होते.