पुणे मेट्रोच्या स्वारगेट मल्टी मोडल हबच्या केंद्र शासनाच्या पर्यावरण समितीची भेट

MahaMetro-Hub-Swargare

पुणे मेट्रोच्या स्वारगेट मल्टी मोडल हबच्या केंद्र शासनाच्या पर्यावरण समितीची भेट.

पुणे मेट्रोच्या स्वारगेट मल्टी मोडल हबच्या पर्यावरण मान्यता मिळवण्यासाठी

MahaMetro-Hub-Swargare
केंद्र शासनाच्या पर्यावरण समितीने भेट देवून पाहणी केली.

र्यावरण समितीचे अध्यक्ष डॉ.दीपक म्हैसेकर, सदस्य श्री. मुकुंद पाठक, सदस्य श्री.किरण आचरेकर, सदस्या डॉ.असीम हरवंश आणि  सदस्य डॉ दत्तात्रय थोरात उपस्थित होते.

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये स्वारगेट हे अत्यंत महत्वाचे स्थानक आहे. स्वारगेट स्थानकामध्ये महाराष्ट्र परिवहन मंडळाचे आणि पीएमपीएमएल चे मोठे बस स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांना जोडण्यासाठी मेट्रोने स्वारगेट येथे मल्टी मोडल हब उभारण्याचे योजिले आहे, जेणेकरून एसटी  बसने आलेले प्रवासी, पीएमपीएमएलचा वापर करणारे प्रवासी, रिक्षा, कार, रेडिओ टॅक्सी इ. वाहनांचा एकत्रित विचार करून तसेच त्यांचे सुचर आवागमन होण्यासाठी मल्टी मोडल हबचे नियोजन केले आहे.
मल्टी मोडल हबसाठी आणि तेथे बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक बांधकामासाठी पर्यावरण विभागाची मान्यता अपरिहार्य आहे. पर्यावरण मान्यतेसाठी महामेट्रोने केंद्र शासनाच्या पर्यावरण समिती ला योग्य त्या कागदपत्रांसहित अर्ज केला होता.
पर्यावरण समितीचे अध्यक्ष डॉ.दीपक म्हैसेकर, सदस्य श्री.मुकुंद पाठक, सदस्य श्री. किरण आचरेकर, सदस्या डॉ.असीम हरवंश आणि  सदस्य डॉ दत्तात्रय थोरात यांनी स्वारगेट मल्टी मोडल हबच्या कामाचे निरीक्षण केले.

महामेट्रोचे संचालक श्री.अतुल गाडगीळ यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती सांगितली. त्याचबरोबर महामेट्रो पर्यावरण संवर्धनासाठी ज्या उपाय- योजना करत  आहे त्याची माहिती सांगितली. समितीचे अध्यक्ष डॉ दीपक म्हैसेकर यांनी महत्वाच्या सूचना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कार्यकारणीच्या इतर सदस्यांनीदेखील महत्वाचे मार्गदर्शन केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *