पुणे रेल्वे विभागावर स्वच्छता मोहीम,विविध उपक्रमांचे आयोजन

Cleanliness campaign on Pune Railway Division पुणे रेल्वे विभागावर स्वच्छता मोहीम हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Cleanliness campaign on Pune Railway Division

पुणे रेल्वे विभागावर स्वच्छता मोहीम,विविध उपक्रमांचे आयोजन

स्वच्छता पंधरवड्यात विविध स्थानके, डेपो आणि रेल्वे वसाहतींमध्ये स्वच्छ संवाद, स्वच्छ ट्रेन, स्वच्छ रेल्वे ट्रॅक, स्वच्छ ऑफिस, कॉलनी आणि परिसर या थीमअंतर्गत स्वच्छतेबाबत विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे : पुणे रेल्वे विभागावर स्वच्छता पंधरवड्यात विविध स्थानके, डेपो आणि रेल्वे वसाहतींमध्ये स्वच्छ संवाद, स्वच्छ ट्रेन, स्वच्छ रेल्वे ट्रॅक, स्वच्छ ऑफिस, कॉलनी आणि परिसर या थीमअंतर्गत स्वच्छतेबाबत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वच्छतेचे संदेश देणारे पोस्टर्स , बॅनर्स घेऊन रॅली चे आयोजन करण्यात आले.Cleanliness campaign on Pune Railway Division
पुणे रेल्वे विभागावर स्वच्छता मोहीम
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे, मिरज येथे प्रवासी आणि सामान्य जन यांच्यासह जनजागृती रॅली काढण्यात आली. स्थानक, डेपो, कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. प्रवाशांना संदेशही देण्यात आला की आपण सर्वांनी आपल्या सभोवताली तसेच स्थानके, गाड्या या ठिकाणी स्वच्छता राखली तर नक्कीच निरोगी राहू आणि आजारी पडण्याची शक्यता कमी राहील. स्वच्छतेबाबत सर्वांचा विचार सारखाच असेल तर स्वच्छ गाव,स्वच्छ देश हे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय व तळेगाव,चिंचवड,खडकी,पुणे,हडपसर,बारामती, सातारा, कोल्हापूर, सांगली, रुकडी, मसूर, शिरवडे, तारगाव आदी स्थानकांवर असलेली कार्यालये, प्रवासी प्रतीक्षालय, घोरपडी डिझेल शेड यांची स्वच्छता करून परिसर निरोगी ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

कोल्हापुर, शिवाजीनगर, सातारा, लोणी आणि रेल्वे कॉलनीमध्ये सघन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कॉलनी नेहमी स्वच्छ राहावी यासाठी रेल्वे कॉलनीतील सफाई कर्मचाऱ्यांशी विविध स्वच्छता उपक्रमांबाबत संवाद साधण्यात आला.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इन्दू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री बृजेश कुमार सिंह यांचे मार्गदर्शनात आणि वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता श्री शादाब जमाल यांच्या संयोजनात विभागावर राबविण्यात येत असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत स्वच्छ रेलगाडी अंतर्गत पुणे विभागावर धावणाऱ्या अहिंसा एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, एर्नाकुलम एक्स्प्रेस आदी गाड्यांच्या रेकची सखोल स्वच्छता करण्यात आली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
कथ्थक नृत्यातून सादर झालेल्या ,गणेश आणि शिवस्तुतीने वातावरण भक्तिमय 
Spread the love

One Comment on “पुणे रेल्वे विभागावर स्वच्छता मोहीम,विविध उपक्रमांचे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *