Municipal Corporation decides to increase the number of computer operators at vaccination centres in Pune city.
पुणे शहरात लसीकरण केंद्रावर संगणक परिचालकांची संख्या वाढवण्याचा महापालिकेचा निर्णय.
पुणे : पुणे शहरात लसीकरण केंद्रावर संगणक परिचालकांची संख्या वाढवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.
पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी काल ही माहिती दिली. अचानक रुग्णसंख्या वाढल्यास सुविधा देण्यासाठी महापालिका तयार आहे.
खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या खासगी आणि शासकीय रुग्णालयातील १३ हजार खाटांची माहिती डॅशबोर्डवर आहे.
गरज पडल्यास २५ हजार खाटांची व्यवस्था करता येईल, असं भारती यांनी सांगितलं.