Increase in the number of coronated inmates at Yerawada Central Jail in Pune.
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातल्या कोरोनाबाधित कैद्यांच्या संख्येत वाढ.
पुणे : पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांची संख्या वाढत चालली असून, त्यांच्या विलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कारागृह महानिरीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
सध्या राज्यातल्या सर्व कारागृहांपैकी येरवडा कारागृहात सर्वात जास्त ८५ कैदी कोरोनाबाधित असून ७ कारागृह कर्मचाऱ्यांनादेखील कोरोंनाची लागण झाली आहे.
या कोरोनाबाधित कैद्यांच्या विलगीकरणासाठी सध्या बार्टी संस्थेच्या वसतिगृहात खुलं कारागृह स्थापन करण्यात आलं असून, तिथं कोरोनाबाधित कैद्यांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.