पुण्यातील स्टार्टअपच्या शिलेदारांचे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाकडून कौतुक.

 A Pune-based startup is appreciated by the alumni team of the university.

पुण्यातील स्टार्टअपच्या शिलेदारांचे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाकडून कौतुक.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाकडून (एसपीपीयू अल्युमिनाय असोसिएशन) पुण्यातील राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आलेल्या स्टार्टअप सुरू करणाऱ्या पाच नवउद्योजकांचा सत्कारPune-based startup is appreciated by the alumni team of the university करण्यात आला. विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभाग व एसपीपीयू अल्युमिनाय असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच देशातील जवळपास ५० स्टार्टअपना गौरवण्यात आले. यामध्ये पुण्यातील अत्रेय इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​डॉ.अनिरुद्ध जोशी, रेपोज आयओटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​चेतन आणि अदिती वाळुंज, पिव्होट चेन सोल्युशन्स टेक्नॉलॉजीचे दीपक राव, अप कर्व्ह बिझिनेस सर्व्हिसेस लिमिटेडचे रवी कुमार आणि वेसाटोगो इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अक्षय दीक्षित यांचाही समावेश होता. या सर्वाचा यावेळी सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ मध्ये आयोजित या सत्कार कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी सर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, इनोव्हेशन केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रसेनजीत फडणवीस, डॉ. संजय चाकणे, माजी विद्यार्थी संपर्क प्रमुख प्रतिक दामा आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ. करमळकर यांनी इनोफेस्टच्या क्लस्टर लेव्हल स्पर्धेच्या विजेत्यांचा नावाची घोषणा केली.

डॉ पालकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पुणे हे स्टार्टअपसाठी तसेच गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे ठिकाण झाले आहे. कोव्हिड काळातही पुण्यात मोठया प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. केवळ भरतातूनच नाही तर परदेशातूनही पुण्यात मागील वर्षात ५३७ मिलियन डॉलरची गुंतवणूक झाली आहे.

राजेश पांडे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कारमूर्ती नवउद्योजकांनी आपले विचार व्यक्त करत विद्यपीठाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आपल्या स्टार्टअप विषयी माहिती सांगितली. पुणे हे आयटीचे केंद्र असून आता हळूहळू ते स्टार्टअपचेही केंद्र बनत असल्याचे विचार या सत्कारमूर्तींनी व्यक्त केले. अक्षय दीक्षित, रवी कुमार, चेतन व अदिती वाळुंज हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. यातील दीपक राव यांनी तर आपला व्यवसाय बेंगलोरहुन पुण्याला आणला.

यावेळी डॉ. नितीन करमळकर म्हणाले, स्टार्टअप संस्कृती विद्यापीठ व महाविद्यालयात रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यापीठात संशोधन, नवप्रयोग करण्यासाठी अनेक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातही सध्या ४० स्टार्टअपवर काम सुरु आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *