अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पु.ल देशपांडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथील प्रतिमेस मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या अजरामर स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
पु.ल.देशपांडे यांचे नाव जरी उच्चारली तरी महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांच्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य उमलते. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पु.ल.देशपांडे यांच्या साहित्याची जादू आजही तमाम मराठी रसिकांवर आहे. महाराष्ट्राला नेहमी खळखळून हसवणारे महान साहित्यिक,विनोदवीर,लेखक पु.ल.देशपांडे.
मराठी साहित्यविश्वाला एका वेगळ्या उंचीवर पोहचवण्यात पु.लं. देशपांडे यांचा सिंहाचा वाटा आहे. साहित्य, नाटक, अभिनय, चित्रपट आणि राजकारणातही पुलंनी आपली वेगळी छबी निर्माण केली. तमाम मराठी माणसाला या हसवण्याचे कसब त्याच्याकडे होते . प्रत्येक गोष्टीत विनोदी बाजू शोधून काढण्यात पु.लं चा हात कोणी धरु शकत नव्हतं. नवीन तंत्रज्ञानामुळे पु.लं च लिखाण , नाटक,सिनेमा, कथाकथन आज उपलब्ध आहे . आजची तरुण पिढीही पु.लं, देशपांडे यांचे विनोद लिखाण त्यातील किस्से आवडीने वाचते किंवा ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत आहेत. \
पु.ल देशपांडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथील प्रतिमेस मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या अजरामर स्मृतीस विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी उपमहापौर सुनीताताई वाडेकर, नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे,संवाद पुणेचे सुनील महाजन,बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते तसेच इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.