पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) 8 ऑगस्ट ऐवजी 9 ऑगस्ट रोजी होणार

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग School Education and Sports Department हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) 8 ऑगस्ट ऐवजी 9 ऑगस्ट रोजी होणार.Education Department

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही 23 मे 2021 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याबाबत जाहिर करण्यात आले होते. तद्नंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन या परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली होती. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही 8 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु 8 ऑगस्ट 2021 रोजी काही जिल्ह्यांत केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
त्यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही परिक्षा 8 ऑगस्ट 2021 ऐवजी दि. 9 ऑगस्ट 2021 घेण्यात येणार आहे. तसेच सदर परीक्षेचे प्रवेशपत्र 27 जुलै 2021 रोजी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या बदलाबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *