पेट्रोल आणि डिझेल ला बायो-इथेनॉल सक्षम पर्याय – नितीन गडकरी.
File Photo
नागपूर : पेट्रोलियम आणि इंधनाच्या आयातीचा खर्च १० हजार कोटीपेक्षा जास्त असून त्याला पर्याय म्हणून पर्यावरण सक्षम तसंच किफायतशीर बायो-इथेनॉलची गरज असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
ते आज नागपूरमध्ये बोलत होते. पेट्रोलवर चालणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये यापुढे फ्लेक्स इंजिनची सुविधा राहणार असून त्यामुळे वाहनांची किंमत बदलणार नाही असं ते म्हणाले.
शंभर टक्के बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांमुळे शेतकऱ्यांना इथेनॉलचे पंप सुरु करायची संधी मिळेल आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडेल असं गडकरी म्हणाले.