प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणा-या राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी साधला संवाद.

Raksha Mantri Shri Rajnath Singh virtually interacts with NCC cadets taking part in Republic Day Camp 2022.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणा-या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी साधला संवाद.

दिल्ली: जासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणा-या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.  आपल्याRaksha Mantri Shri Rajnath Singh virtually interacts with NCC cadets taking part in Republic Day Camp 2022.Raksha Mantri Shri Rajnath Singh virtually interacts with NCC cadets taking part in Republic Day Camp 2022.Raksha Mantri Shri Rajnath Singh virtually interacts with NCC cadets taking part in Republic Day Camp 2022.Raksha Mantri Shri Rajnath Singh virtually interacts with NCC cadets taking part in Republic Day Camp 2022. छात्रांमध्ये एक नेता, सैनिक, कलाकार, संगीतकार आणि सर्वात उत्तम माणूस हे गुण राष्ट्रीय छात्र सेना रूजवत असल्याबद्दल त्यांनी या संघटनेचे कौतुक केले.Raksha Mantri Shri Rajnath Singh virtually interacts with NCC cadets taking part in Republic Day Camp 2022.

छात्रांनी जीवनाचा उद्देश शोधावा आणि त्यासाठी संघटनेमध्ये शिकविण्यात येणारे ऐक्य, शिस्त, खरेपणा, धैर्य, एकोपा आणि नेतृत्व या गुणांचा अवलंब करून समाजामध्ये आपल्या कार्यातून ठसा उमटविणा-या एनसीसीच्या अनेक माजी विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. तरूणांना एकसंध आणि शिस्तबद्ध शक्तीमध्ये रूपांतरित करून  एनसीसी उत्तम सेवा करीत आहे, असेही  संरक्षण मंत्री यावेळी म्हणाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीचा यावेळी दाखला दिला. ते म्हणाले, ‘‘ विवेकानंद यांच्या शब्दात सांगायचे तर तुम्ही नरकेसरी आहात, तुम्ही शुद्ध आत्मा आहात, तुमच्यामध्ये अनंत क्षमता आहेत आणि तुम्ही परिपूर्ण आहात, या संपूर्ण विश्वाचे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे.’ तुमच्यासारख्या छात्रांनी भव्य स्वप्ने पहावीत आणि  भीती आणि संशय अशा बंधनांना झुगारून त्या स्वप्नांच्या पूर्तीचे ध्येय साध्य करावे, त्यासाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अजूनही कोविड-19 पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांबरोबर आभासी माध्यमातून संवाद साधण्याचा निर्णय घेतला.

दिल्ली कँटोन्मेंटच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये छात्रांनी संरक्षण मंत्र्यांच्या स्वागतपर ‘शत शत नमन’ हे रंगतदार गीत  सादर केले. यावर्षीच्या रक्षा मंत्री पदकाची आणि प्रशस्तीपत्रक विजेत्यांची घोषणा यावेळी करण्यात आली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *