Separate television channels will be started for the education of students of each class.
प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं यासाठी सुरू होणार स्वतंत्र दूरचित्रवाहिन्या.
नवी दिल्ली : इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक राज्य आपल्या प्रादेशिक भाषांतून शिक्षण देईल. पीएम ई-विद्याअंतर्गत वन-क्लास वन-टिव्ही चॅनल कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी २०० टिव्ही चॅनलची निर्मिती करण्यात येईल. व्यवसायिक अभ्यासक्रमांअंतर्गत चिंतन कौशल्य आणि सर्जनशीलतेवर जोर दिला जाईल.
वर्ष २०२२-२३ मध्ये विज्ञान आणि गणित या विषयांच्या ७५० प्रयोगशाळांची स्थापना करण्याचा मानस आहे. आकस्मिक शिक्षण योजनेसाठी ७५ स्किलिंग ई-प्रयोगशाळांची स्थापना केली जाईल. विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी नॅशनल टेलिमेंटल हेल्थ कार्यक्रम राबवला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता जागतिक दर्जापर्यंत वाढवण्यासाठी एका डिजिटल विद्यापीठाच्या निर्मितीचा मानस असल्याचं त्या म्हणाल्या. इंटरनेट, मोबाईल फोन, टिव्ही आणि रेडिओवर डिजिटल शिक्षकांद्वारे उच्च गुणवत्तापूर्ण ई-कन्टेट दिलं जाईल. मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम आंगणवाडी आणि पोषण-२ या नव्या योजना सुरु केल्या जाणार आहे.