प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात भाजपातर्फे निदर्शनं

BJP protests against an objectionable statement made by Congress state president Nana Patole against Prime Minister Narendra Modi.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात भाजपातर्फे निदर्शनं.BJP protests against an objectionable statement made by Congress state president Nana Patole against Prime Minister Narendra Modi.

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बाबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष्य आणि खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी नाना पटोलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबईत दहिसर इथं आमदार मनिषा चौधरी यांनी दहिसर पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांना नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याचे निवेदन दिलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय वक्तव्यं करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी तसंच पटोले यांच्या विरोधात एफ. आय. आर दाखल करून घेण्याची सूचना द्यावी, अशी मागणी मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उद्या बुधवारी १९ जानेवारीला सकाळी ११ वाजेपर्यंत पटोले यांच्यावर कारवाई झाली नाही तर चर्चगेट इथल्या गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्यपाल यांच्या भेटी दरम्यान दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी बेताल वक्तव्य केलं असून मुंबई भाजपा पटोलेंचा तीव्र निषेध करत आहे, असं निवेदनात म्हटलं आहे. या शिष्टमंडळात मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार कालिदास कोळंबकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *