प्रसार भारती नेटवर्कवर टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे प्रसारण.

Cricket-Image

प्रसार भारती नेटवर्कवर टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे प्रसारण.

टी 20 विश्वचषक 2021 स्पर्धेसाठी उलट गणना सुरू झाली असून प्रसार भारती नेटवर्कवर या स्पर्धेचे सामने थेट प्रसारित केले जाणार आहेत. भारतातील क्रिकेटप्रति आवड लक्षात घेऊन दूरदर्शन आणि आकाशवाणीने सामन्यांचे थेट प्रसारण, रेडिओ समालोचन  आणि विशेष कार्यक्रमांसह मेगा कव्हरेजचे नियोजन केले आहे.

Cricket-Image
Image Source Pixabay.com

सर्व क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे, भारताचे सर्व सामने, उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांचे डीडी फ्री डिशवर डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर थेट प्रसारण केले जाईल. 23 ऑक्टोबरपासून आकाशवाणी हिंदी आणि इंग्रजी भाषेतून सर्व सामन्यांचे समालोचन थेट प्रसारित करेल.

या वेळी दूरदर्शनवर टी 20 विश्वचषक स्पर्धेचे सामने पाहणे हा अधिक रोमांचक अनुभव असेल कारण डीडी स्पोर्ट्सने लोकसहभागासह विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. ‘क्रिकेट लाइव्ह’ नावाच्या शोमध्ये, ‘पब्लिक का कप्तान’  अंतर्गत सामान्य लोकांना कर्णधाराची टोपी घालायला आणि कर्णधार म्हणून महत्त्वाचे निर्णय घेण्यास सांगितले जाईल. ‘आरजेज का क्रिकेट फंडा’ हा आणखी एक मनोरंजक टॉक शो आहे ज्यात क्रिकेट तज्ञांसह ऑल इंडिया रेडिओ जॉकी डीडी स्पोर्ट्सवर लोकांशी संवाद साधतील. प्रसार भारतीमधील नाविन्यता यातून दिसणार असून टीव्ही आणि रेडिओ समन्वयाचे हे उत्तम उदाहरण आहे.

Schedule of Matches and Special Shows on DD Sports

Match/Show Date Time
 

India Vs Pakistan

 

 

October 24, 2021

 

7:30 PM onwards

India Vs New Zealand October 31, 2021

 

7:30 PM onwards
India Vs Afghanistan November 3, 2021

 

7:30 PM onwards
India Vs TBD November 5, 2021 7:30 PM onwards

 

India Vs TBD November 8, 2021 7:30 PM onwards

 

First Semi-final November 10, 2021 7:30 PM onwards

 

Second Semi-final November 11, 2021 7:30 PM onwards

 

Final November 14, 2021 7:30 PM onwards

आकाशवाणीवरून भारताचे सामने, उपांत्य सामने आणि अंतिम सामना 66 पेक्षा जास्त प्राथमिक चॅनेल ट्रान्समीटर्स, एफएम रेनबो नेटवर्क, 86 एलआरएस स्टेशन्स, 12 एफएम रिले ट्रान्समीटर्स, डीटीएच आणि डीआरएमवरून प्रसारित करेल. एलआरएस, एफएम रिले ट्रान्समीटर, डीटीएच आणि डीआरएमवर भारत खेळणार नसलेले सामने प्रक्षेपित केले जातील.

प्रसार भारती स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनेलवर डीडी स्पोर्ट्सवरील सर्व विशेष शो थेट-प्रसारित केले जातील.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *