बँक ऑफ महाराष्ट्रच्या २००० व्या शाखेचे तिरुमला येथे उद्घाटन , धार्मिक स्थळी नव्या युगातील बँकिंग सुविधा देण्यासाठी कटिबद्धता.
पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने आपली २००० वी शाखा आंध्र प्रदेशाच्या चित्तूर जिल्ह्यातील भगवान व्यंकटेश्वराचे स्थान असलेल्या
तिरुपती येथील तिरुमला येथे सुरु केली. तिरुपती तिरुमला देवस्थानमचे उपाध्यक्ष श्री धर्मारेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी खासदार श्री पेड्डी रेड्डी मिथुन रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा , बँकेचे संचालक श्री एम के वर्मा व श्री राकेश कुमार व अन्य सर्व सरव्यवस्थापक उपस्थित होते.
तिरुमला येथे बँकेची २०००वी शाखा सुरु होणे हा बँकेसाठी एक मैलाचा दगड असल्याचे व त्यामुळे सन्मानित झाल्याची भावना असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा यांनी
उद्घाटन समारंभाला उपस्थित संम्मेलनाला संबोधित करताना सांगितले. बँकेच्या व्यापक स्तरावरील ग्राहकांना नव्या युगातील बँकिंग सुविधा देण्यासाठी ही एक मोठी संधि असल्याचे प्रतिपादन करून यामुळे बँकेच्या ग्राहकांचा पाया अधिक व्यापक होऊन विस्तारेल व बँकिंग व्यवहार करणे त्यांच्यासाठी अधिक आनंददायी होईल असा अभिप्राय बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा यांनी व्यक्त केला.
सद्य वित्तीय वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बचत ठेवी व कर्ज वितरणात बँक ऑफ महाराष्ट्राने सार्वजनिक बँकांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत बँकेचा एकूण व्यवसाय रु २.९७ लाख कोटी पर्यंत पोहोचला असून कर्ज व्यवहार रु १.१५ लाख कोटी पर्यंत पोहोचला आहे. यंदाच्या सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेच्या निव्वळ नफ्यात १०३ % वाढ होऊन तो रु २६४ कोटी पर्यंत पोहोचला आहे. रिटेल कर्जात बँकेने १४.४७ % वाढ नोंदविली असून सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना दिलेल्या कर्जात २०.६६ % वाढ साध्य केली आहे. चालू व बचत ठेवी ५४ % असून देशाच्या बँकिंग उद्योगात हे परमात सर्वात जास्त आहे. व्याजाच्या निव्वळ उत्पन्नात ३४% वार्षिक वाढ झाली असून ते रु ११२८.०० कोटी आहे.