बँक ऑफ महाराष्ट्रला राजभाषाचा सर्वोच्च सन्मान कीर्ती पुरस्कार.
राजभाषा हिंदीच्या सर्वोत्तम अंमलबजावणीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रला;कीर्ती पुरस्कार देण्यात आला. 14 सप्टेंबर 2021 रोजी हिंदी दिनानिमित्त विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात माननीय गृह राज्य मंत्री श्री. निशिथ प्रामाणिक ह्यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. ए. एस. राजीव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि माननीय गृह मंत्री श्री. अमित शाह होते. माननीय गृह राज्यमंत्री श्री. नित्यानंद राय, श्री. अजयकुमार मिश्रा आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. हेमन्त टम्टा, दिल्ली अंचलच्या महाव्यवस्थापक श्रीमती चित्रा दातार, महाव्यवस्थापक (मा. सं. प्र. आणि राजभाषा) श्री. राधे श्याम बंसल आणि सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ. राजेन्द्र श्रीवास्तव देखील उपस्थित होते.