बँक ऑफ महाराष्ट्र कडून रिटेल बोनान्झा – मान्सून धमाका ऑफर.
देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने दिनांक ९ ऑगस्ट २०२१ पासून रिटेल बोनान्झा – मान्सून धमाका ऑफर घोषित केली आहे. सोने तारण, गृह कर्ज व वाहन कर्ज योजनेच्या अंतर्गत दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत कर्ज प्रक्रिया शुल्क बँक ऑफ महाराष्ट्रने माफ केले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या रिटेल ग्राहकांसाठी या उत्सवी हंगामात ग्राहकांचे हित आणि त्यांचा आनंद द्विगुणित करण्याकरिता अनेक सवलतीसह विविध कर्जांवरील प्रक्रिया शुल्क देखील माफ केले आहे. बँकेने वाहन कर्ज व गृह कर्ज योजना अनुक्रमे ६.९० % व ७.३० % या दरापासून तसेच ९० % पर्यंत कर्ज देऊ केले आहे. त्याच प्रमाणे गृह कर्ज योजनेत सर्व समिकृत मासिक हप्ते नियमितपणे भरणा करणारे ग्राहक दोन हप्त्यांची सूटीस पात्र ठरतील. कर्जाचे हप्ते नियमीत वेळेपेक्षा अगोदर भरल्यास किंवा अधिक रक्कम भरणा केल्यास किंवा कर्ज खाते मुदतीच्या अगोदर बंद केल्यास कोणतेही शुल्क बँक आकारणार नाही.
बँकेने सोने तारण कर्ज योजनेची देखील पुनर्रचना केली असून त्यामध्ये ७.१० % दराने रु २०.०० लाखापर्यंत कर्ज देऊ केले आहे व रु १.०० लाख रकमे पर्यंतच्या कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे.
सोने तारण कर्ज मंजूर करण्यासाठी बँकेने आपल्या काही निवडक शाखांमध्ये “ गोल्ड लोन पॉइंट “ नावाने एक विशिष्ठ काउंटर सुरु केले असून तिथे १५ मिनिटात सोने तारण कर्ज मंजूर करण्यात येईल. “ आगामी सणासुदीच्या हंगामासाठी सदर रिटेल बोनान्झा – मान्सून धमाका घोषित करून आमच्या रिटेल ग्राहकांना सोने तारण, गृह व वाहन कर्जात आम्ही अतिशय आकर्षक सवलती देऊ केल्या असून व्याज दर कमी ठेवल्यामुळे व कर्ज प्रक्रिया शुल्क माफ केल्यामुळे बँकेच्या रिटेल ग्राहकांना त्याचा लाभ होईल असे बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा यांनी सांगितले.