बाल हक्कासाठी प्रयत्न करून बाल स्नेही महाराष्ट्र घडविणार

By striving for child rights, child-friendly Maharashtra will be made

बाल हक्कासाठी प्रयत्न करून बाल स्नेही महाराष्ट्र घडविणार -ॲड. सुशीबेन शहा

मुलांच्या विचार प्रक्रियेला चालना देऊन त्यांना योग्यप्रकारचे शिक्षण द्यावे लागेल

पुणे : बाल हक्कासाठी प्रयत्न करून बाल स्नेही महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शहा यांनी केले.

Women & Child Development
Women and Child Development

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व होप फाउंडेशन पुणे यांच्यावतीने लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) आणि बाल न्याय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे शुक्रवारी पुणे विभागातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीत जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुण्याचे शहरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोफळे, आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे, जयश्री पालवे, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, आयोगाचे विधी सल्लागार प्रमोद बाडगी आदी उपस्थित होते.

ॲड. सुशीबेन शहा म्हणाल्या, मुलांच्या विचार प्रक्रियेला चालना देऊन त्यांना योग्यप्रकारचे शिक्षण द्यावे लागेल. गुन्हे होऊच नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पोक्सो आणि जेजे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गावपातळीपासून ते महानगरापर्यंत सर्वप्रकारची यंत्रणा कार्यान्वित आहे. बाल हक्कांच्या संरक्षणासाठी समित्या आहेत. यासंदर्भात जनजागृती आणि कायद्याची अंमलबजावणी यासाठी बाल हक्क आयोग आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक जिल्ह्याच्या समितीकडे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) आणि बाल न्याय कायदा अंतर्गत सरासरी ५ ते १० प्रकरणे येतात. प्रत्यक्षात त्रस्त झालेलीच मुले पुढे येतात. अनेकजण पुढेही येत नाहीत, याकडेही ॲड. सुशीबेन शहा यांनी बैठकीत लक्ष वेधले. बाल हक्कांसंदर्भात न्याय देण्यात विलंब होऊ नये. सर्व विभाग एकत्र येतील तेव्हा खऱ्या अर्थाने बाल स्नेही महाराष्ट्र होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आयोगाने प्रत्येक विभागातील अशाप्रकारे जिल्ह्यांची आढावा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. बाल हक्कासंदर्भात आढावा बैठकीत घेण्यात आलेले निर्णय, प्रत्येक जिल्ह्याच्या समस्यांचा अभ्यास करून त्यातून पुढे आलेल्या सूचना या न्यायसंस्था आणि राज्य शासनाला सादर करण्यात येणार असून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पुणे विभागातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) आणि बाल न्याय कायद्याअंतर्गत पोलीस आणि बाल कल्याण समितीकडून प्राप्त झालेल्या माहितीविषयी या आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. लहान मुलांसाठीच्या लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) आणि बाल न्याय कायद्याची अंमलबजावणी होते का याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय बाल कामगार, बाल तस्करी, बालविवाह, पोर्नोग्राफी कमी कशी होईल यावरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पुणे येथे एका माथेफिरू तरूणाच्या हल्ल्यातून तरूणीला वाचविणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचा ॲड. सुशीबेन शहा यांनी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. या दोघांनीही प्रसंगावधान, सामाजिक बांधिलकी आणि माणूसकी दाखवत त्या तरूणीचा जीव वाचवल्याबद्दल त्या दोघांचेही आभार मानले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

पुण्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *