Promise to complete the investigation into the allegations against Brijbhushan Singh and file the charge sheet by June 15
बृजभूषण सिंग यांच्याविरुद्धच्या आरोपांचा तपास १५ जूनपर्यंत पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याचं आश्वासन
बृजभूषण सिंग यांच्याविरुद्धच्या, लैंगिक छळाच्या आरोपांचा तपास १५ जूनपर्यंत पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याचं अनुराग सिंह ठाकूर यांचं आश्वासन
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांचा तपास १५ जूनपर्यंत पूर्ण करून आरोपपत्र दाखल केलं जाईल असं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.
बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक कुस्तीपटूंनी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांची नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तेंव्हा ते बोलते होते. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक ३० जून पर्यंत घेण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं.
तसंच २८ मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीच्या उदघाटनच्या दिवशी दिल्लीत आंदोलन केल्याप्रकरणी कुस्तीपटुंवर दाखल केलेले गुन्हे देखील मागे घेतले आहेत. ठाकूर यांनी या सर्व कुस्तीपटूंना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलं होतं.
सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निदर्शनं करत असून त्यांच्या अटकेची मागणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनीही आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेतली होती.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com