Railway job aspirants found indulging in unlawful activities may face lifetime debarment from obtaining Railway job, says Railway Ministry.
रेल्वेत नोकरी मिळवण्यास इच्छुकांचा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभाग आढळल्यास रेल्वेत नोकरी मिळवण्याच्या बाबतीत त्यांना आजीवन बंदीला सामोरे जावे लागू शकते – रेल्वे मंत्रालय.
नवी दिल्ली : रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्यास इच्छुक असलेल्यांकडून रेल्वे रुळांवर निदर्शने, रेल रोको, रेल्वे मालमत्तेचे नुकसान यासारख्या तोडफोड/बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आल्याचे असे रेल्वे मंत्रालयाने आज जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये नमूद केले आहे.
अशा प्रकारची कृत्ये ही बेशिस्तीची सर्वोच्च पातळी असून यामुळे ते रेल्वे/सरकारी नोकरीसाठी अयोग्य ठरतात असे या नोटिशीत म्हटले आहे. या बेशिष्ट वर्तणुकीचे चित्रीकरण विशेष संस्थांच्या मदतीने तपासले जाईल आणि बेकायदेशीर वर्तनात सहभाग आढळलेल्या उमेदवार/इच्छुक यांच्यावर पोलिस कारवाई तसेच रेल्वेची नोकरी मिळविण्यावर आजीवन बंदी घातली जाईल.
रेल्वे भरती मंडळे (RRBs)प्रामाणिकपणे निष्पक्ष आणि पारदर्शक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहेत. रेल्वेच्या नोकरीसाठी इच्छुक/उमेदवारांनी बेशिस्तपणे वागू नये किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करू पाहणाऱ्या घटकांच्या प्रभावाला बळी पडू नये, असे आवाहन रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.