Pilot project for the conversion of salty water to fresh water at Borala in Amravati district
अमरावती जिल्ह्यातील बोराळामध्ये खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्याचा रुपांतरचा प्रायोगिक प्रकल्प
खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्याच्या ऐतिहासिक प्रयोगाची नितीन गडकरींकडून पाहणी
अमरावती, अकोला अन् बुलढाण्याचा पाणीप्रश्न मिटणार
दर्यापूर : महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर बोराळा इथं पूर्णा नदीच्या खारपाण पट्ट्यातील खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्याच्या ऐतिहासिक प्रयोगाची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड पाण्यात करणाऱ्या या पहिल्या प्रायोगिक प्रयोगाला शासना कडून प्रायोगिक तत्त्वावर दिड कोटींचं अर्थसहाय्य मिळालं असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
या प्रयोगामुळे अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या ९५० गावांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पामुळे जमिनीपासून केवळ काही फुटांवर गोड पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.
हा प्रयोग जर यशस्वी झाला तर या तीन जिल्ह्यांमध्ये साडेनऊशे अशा प्रकारचे प्रकल्प उभारून हा जिल्हा खालपान मुक्त होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पामुळे जमिनीपासून केवळ ५० फुटांवर गोड पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. खारपण पट्ट्यातील खाऱ्या पाण्यामुळे ओलित करणे शक्य नव्हते मात्र या प्रकल्पामुळे आता खारपण पट्यातील शेतकरी 2 ते 3 पिके घेऊ शकणार आहे
खाऱ्या पाण्यातील झिंग्यांना बाहेर देशात मोठ्या प्रमाणात मागणी असून याठिकाणी शेतकऱ्यांनी झिंग्याच्या शेतीवर भर द्यावा त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी ५० लाख रुपयाचे उत्पादन होणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं. त्यामुळे मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा पत्र दिले आहे. या ठिकाणी तलाव बांधून खाऱ्या पाण्यातील झिंगे तयार झाले तर संपूर्ण जगात एक्स्पोर्ट करता येईल, येथे शेतकरी समृद्ध होईल असे यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com