भांडारकर संस्थेतर्फे ११ ते १९ डिसेंबर ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन.

भांडारकर संस्थेतर्फे ११ ते १९ डिसेंबर ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन.

पुणे: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने ११ ते १९ डिसेंबर या १० दिवसांच्या कालावधीत भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (११ डिसेंबर) रोजी सकाळी १० वाजता गणेश बिडकर (सभागृह नेते, पुणे मनपा) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार सिद्धार्थ शिरोळे, ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत, राहुल सोलापूरकर, श्रीनिवास कुलकर्णी व डायमंड पब्लिकेशन्सचे दत्तात्रय पाष्टे उपस्थित होते. सर्वांसाठी मोफत प्रवेश असणारे हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होणार असून हे प्रदर्शन डायमंड पब्लिकेशन्सच्या सहकार्याने होत आहे.

विविध विषयावरील सुमारे १० हजार पुस्तके प्रदर्शनात उपलब्ध असतील. यामध्ये भांडारकर संस्थेची विविध ३०० पुस्तके देखील विक्रीस उपलब्ध असतील. यामध्ये दुर्मिळ असणाऱ्या हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र (५ खंड), महाभारताची चिकित्सक आवृत्ती (१९ खंड) आणि वेदिक बिबिलोग्राफी या मोठ्या खंडांच्या ग्रंथांना ४० टक्के सवलत दिली जाणार आहे. याबरोबरच भांडारकर संस्थेने दुर्मिळ असलेली – योग पतंजली, पर्युषण कल्पसुत्र, बुधभूषण, छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती, पतंजली व्याकरण अशा विविध १४ ग्रंथांचे पुनर्मुद्रण नुकतेच केले असून हे ग्रंथ देखील या प्रदर्शनात विक्रीस ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय भारत इतिहास संशोधन मंडळाच्या शिवचरित्राच्या पाचव्या खंडाचे प्रकाशन देखील या प्रदर्शनात होणार आहे.

दुर्मिळ असलेल्या – बालभारत, रसोपनिषद, विजनवासातील स्वातंत्र्य, लोकदेवता द्रौपदी, बुद्धभूषणम या पुस्तकांचे देखील प्रकाशन भांडारकर संस्थेतर्फे लवकरच केले जाणार आहे. भांडारकर संस्थेने दुर्मिळ असणाऱ्या सुमारे १६ हजार ग्रंथांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले असून आता ऑनलाईन वाचण्यास देखील उपलब्ध झाले आहे. डिजिटलायझेशनची ही विशेष सेवा आता अन्य संस्थांसाठी देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *