भांडारकर संस्थेतील “महाराष्ट्र दालनाचे ” उद्घाटन

Unveiling of an oil painting of Dr Dhere on behalf of Bhandarkar Oriental Research Institute भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने डॉ.रा.चिं.ढेरे यांच्या तैलचित्राचे अनावरण हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Inauguration of “Maharashtra Gallery” at Bhandarkar Institute

भांडारकर संस्थेतील “महाराष्ट्र दालनाचे ” उद्घाटन

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने डॉ.रा.चिं.ढेरे यांच्या तैलचित्राचे अनावरण

आजवर ढेरे कुटुंबियांकडून सुमारे ८ हजारापेक्षा अधिक पुस्तके संस्थेला

पुणे : सामजिक, आर्थिक अथवा राजकीय लाभासाठी डॉ. रा चिं ढेरे यांनी संशोधन किंवा लेखन केले नाही तर स्वतंत्र लेखनाबरोबर त्यांनी संशोधनाला प्राधान्य दिले आणि विविध विषयांच्या पुस्तकांचा संग्रह केला, असे मत डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या अध्यक्षा आणि मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी आज येथे व्यक्त केले आहे.Unveiling of an oil painting of Dr Dhere on behalf of Bhandarkar Oriental Research Institute
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने डॉ.रा.चिं.ढेरे यांच्या  तैलचित्राचे अनावरण 
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने डॉ. रा. चिं. ढेरे यांचे तैलचित्र आणि महाराष्ट्र संस्कृती दालनाचा प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डेक्कन कॉलेज विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर होते. व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मंडळ सदस्य सुश्रुत वैद्य, राज कोठारी उपस्थित होते. यावेळी हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र या ग्रंथावर आधारित ऑनलाईन अभ्यासक्रमाचे देखील उद्घाटन करण्यात आले.

डॉ. ढेरे यांनी सांगितले की, भांडारकर संस्थेविषयी अण्णांना जिव्हाळा आपुलकी होती. अनेकदा ते संस्थेत येत असत. त्यांनी मनापासून साहित्यावर प्रेम केले तसेच संशोधनावर भर दिला होता. विशेष म्हणजे त्यांनी विविध विषयांची पुस्तके जमा केली होती. अभ्यासक, संशोधक यांना पुस्तकांचा उपयोग व्हावा यासाठी आमच्या कुटुंबियांच्या वतीने संस्थेला ही सर्व पुस्तके देत आहोत. याचा नक्कीच आनंद आहे. यापुढील काळात आणखी पुस्तके दिली जाणार आहेत. यावेळी त्यांनी अण्णांच्या विविध आठवणींना उजाळा दिला आणि पुस्तक जमा करतांना आलेले अनुभव सांगितले.

डॉ. देगलूरकर यांनी सांगितले की, अण्णांबरोबर ६५ वर्षांपेक्षा अधिक काळ स्नेह होता. त्यांनी असंख्य पुस्तके जमा करुन निःस्पृहपणाने संस्थेला दिली, हे खरोखर अवघड काम आहे. अण्णांनी सतत मूलभूत संशोधनावर भर दिला आहे. त्यांनी जमा केलेली पुस्तके संस्थेला भेट दिली, याचे अनुकरण इतरांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविकात रावत यांनी सांगितले की, आजवर ढेरे कुटुंबियांकडून सुमारे ८ हजारापेक्षा अधिक पुस्तके संस्थेला देण्यात आली आहेत. संशोधक, अभ्यासक यांना पुस्तकांचा उपयोग व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. तसेच वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. त्याचप्रमाणे विविध उपक्रमांसाठी राज कोठारी यांनी संस्थेला भरघोस अर्थसहाय्य केले आहे. कोठारी फाऊंडेशनचे राज कोठारी यांनी ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य दिले असून या कोर्सची आखणी गौरी मोघे यांनी केली आहे. एकूण. २५ व्याख्यानांचा हा कोर्स इंग्रजी भाषेत आहे.

मंडळाचे सदस्य वैद्य यांनी मनोगतात संस्थेच्या कामकाजाची तसेच विविध उपक्रमांची माहिती सांगितली. राज कोठारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी आभार मानले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
’आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ अंतर्गत ११ लाखाहून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
Spread the love

One Comment on “भांडारकर संस्थेतील “महाराष्ट्र दालनाचे ” उद्घाटन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *