भारताच्या संरक्षणविषयक उत्पादकतेला अधिकाधिक ‘भारतीय’ करण्यासाठी डीआयएटी प्रयत्नशील.

Raksha Mantri Shri Rajnath Singh

भारताच्या संरक्षणविषयक उत्पादकतेला अधिकाधिक ‘भारतीय’ करण्यासाठी डीआयएटी प्रयत्नशील : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग.

ठळक वैशिष्ट्ये :
  • महत्वाच्या संरक्षण तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विषयक संरक्षण संस्था- DIAT प्रयत्नशील
  • क्वांटम तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन विषयक अध्ययन
  • विवाहित पीचडी अभ्यासक/आंतरराष्ट्रीय विद्यार्थी/ अर्धवेळ व्याख्याते यांच्यासाठी निवासाची व्यवस्था

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी (DIAT) या अभिमत विद्यापीठाला भेट दिली, या संस्थेच्या आज झालेल्या सहाव्या सर्वसाधारण सभेत ते सहभागी झाले होते. संरक्षण मंत्री या संस्थेचे अध्यक्ष आणि कुलगुरू आहेत. यावेळी बोलतांना ते म्हणाले, की संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षाविषयक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून डीआयएटी देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान देत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.

आपला देश आत्मनिर्भर व्हावा, असा आपल्या पंतप्रधानांचा दृष्टिकोन आहे. या दृष्टीने, आम्ही देशातील संरक्षण तंत्रज्ञानाचे आणि उत्पादकतेचे  भारतीयीकरण करण्यासाठी  अनेक पावले उचलली आहेत, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक आधुनिक तंत्रज्ञानासह, आधुनिक काळातील युद्धासाठी कुशल असे मनुष्यबळही लागेल, असे राजनाथ सिंह म्हणाले.

या दिशेने, डीआयएटी ने, क्वांटम तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन विषयक अध्ययनाची सुरुवात  करत सक्रिय पुढाकार घेतल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. भारतीय मूळाचे नामवंत प्राध्यापक आणि परदेशतील सुप्रसिद्ध संस्थांशी समन्वय साधून सुरु झालेली ही संस्था, एक आघाडीचे तंत्रज्ञान केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डीआयएटी ने क्वांटम तंत्रज्ञान, आणि रोबोटिक्स क्षेत्रात, आंतरशाखीय अध्ययन आणि शिक्षण अभ्यासक्रम देखील सुरु केले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. या तंत्रज्ञानाची काही प्रात्यक्षिकेही त्यांच्यासमोर सादर करण्यात आली.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा या विषयात, डीआयएटीने युवा अभियांत्रिकी व्यावसायिकांसाठी ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील सुरु केले आहेत, याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.. हे अभ्यासक्रम भविष्यातील माहिती सुरक्षा आणि वॉर गेमिंगसाठी मूलभूत माहिती देणारे आहेत. “डीआयएटी ने आतापर्यंत अशा 1500 युवा व्यावसायिकांना प्रशिक्षित केले आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.” असेही संरक्षण मंत्री यावेळी म्हणाले.

Raksha Mantri Shri Rajnath Singh
Raksha Mantri Shri Rajnath Singh

गेल्या काही वर्षांत एम टेक, एमएससी आणि पीएचडीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून अनेक हुषार विद्यार्थी याकडे वळत आहेत. पुस्तके, पेटंट आणि पेपर प्रकाशने वाढत असून  संस्थेची शैक्षणिक वाढ दाखवतात.

सर्वसाधारण बैठकीनंतर संरक्षण मंत्र्यांनी डीआयएटीचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांना संबोधित केले. ते म्हणाले की, डीआयएटी मान्यताप्राप्त विदेशी संस्थांमधून भारतीय वंशाच्या प्रख्यात प्राध्यापकांबरोबर सहकार्य करण्याबाबत प्रयत्नशील असून यामुळे आपली संस्था या क्षेत्रातील अग्रेसर तंत्रज्ञान संस्था बनू शकेल. या महत्वपूर्ण तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्णतेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी डीआयएटीचे अभिनंदन केले.

आपल्या संरक्षण सेवांसाठी जे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, क्रिप्टोलॉजी सारखे विविध अल्पकालीन विशेष अभ्यासक्रम आयोजित करणाऱ्या डीआयएटीच्या वैशिष्ट्याबद्दल  बोलताना, राजनाथ सिंह म्हणाले, “या संस्थेने अनेक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. सशस्त्र दल आणि डीआरडीओचे शास्त्रज्ञांना  अशा कार्यशाळांद्वारे नियमित नवी माहिती मिळते आणि या विद्यापीठातून नियमित डॉक्टरेट आणि पदव्युत्तर पदवी मिळवत आहेत.”

डीआयएटीच्या शैक्षणिक उत्कृष्टतेबद्दल बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले, “डीआयएटीचे व्याख्याते हे त्यांच्या कार्यक्षेत्रात अग्रगण्य आहेत आणि मला असेही सांगण्यात आले आहे की डीआयएटीच्या 3 प्राध्यापकांना जगातील पहिल्या दोन टक्के विद्वानांमध्ये स्थान देण्यात आले आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि या यशाबद्दल  त्यांना शुभेच्छा देतो.

संरक्षण मंत्र्यांनी संकुलामध्ये पीएचडी स्कॉलर/आंतरराष्ट्रीय विद्यार्थी/अभ्यागत प्राध्यापकांसाठी नव्याने बांधलेल्या निवास सुविधेचे उद्घाटन केले. वसतिगृहाच्या उद्घाटनानंतर त्यांनी डीआयएटीच्या फ्री स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन प्रकल्पाचे प्रात्यक्षिक पाहिले.
महामारीच्या कठीण काळात डीआयएटी  आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDOP)  पुढे आल्याबद्दल  राजनाथ सिंह यांनी त्यांची प्रशंसा केली.  या काळात डीआयएटीने कोविड -19 विरुद्ध लढताना नऊ पेटंट मिळवली आणि या तंत्रज्ञानाचे उद्योग भागीदारीत रूपांतर केले.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष जी सतीश रेड्डी, डीआयएटीचे कुलगुरू डॉ सी पी रामनारायणन, वरिष्ठ प्राध्यापक सदस्य, वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी आणि विचारवंत यावेळी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *