भारतीय टपाल सप्ताहानिमित्त भारतीय टपाल विभागातर्फे टपाल दिवस साजरा

भारतीय टपाल सप्ताहानिमित्त भारतीय टपाल विभागातर्फे टपाल दिवस साजरा.

देशभरातील विविध टपाल मंडळांमध्ये ग्राहकभेटींचे आयोजन.

देशभरात कार्यान्वित टपाल कार्यालये आणि पत्र कार्यालये यांच्या विस्तृत जाळ्याच्या माध्यमातून भारतीय टपाल विभाग पत्रे आणि पार्सले यांचे वितरण करण्यासाठी देशातील प्रत्येक घरात अगदी दुर्गम ग्रामीण भागात देखील पोहोचत आहे. पोस्टमेन/पोस्टविमेन, ग्रामीण डाक सेवक आणि पत्रे तसेच पार्सले यांचे बुकिंग, हस्तांतरण आणि वितरणात गुंतलेल्या इतर टपाल अधिकाऱ्यांच्या योगदानाची पोचपावती देण्यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे 16 ऑक्टोबर 2021 ला टपाल दिवस साजरा होत आहे.  यावर्षीचा ‘टपाल दिवस’ साजरा करण्यासाठी टपाल विभागाने देशाभारतील विविध टपाल मंडळांमध्ये ग्राहकभेटींचे आयोजन केले आहे. India Post Logo

ग्राहकांच्या अपेक्षेला अनुसरून टपाल सेवेचा दर्जा आणखी वाढवून गुणवत्ता कायम राखण्यासाठी  भारतीय टपाल विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. टपाल प्रक्रिया, हस्तांतरण आणि वितरण कार्यालयांदरम्यान माहितीचा ओघ वास्तव स्वरुपात कायम राहील हे सुनिश्चित करण्यासाठी भारतीय टपाल सेवेने टपाल जाळ्यामध्ये मध्यवर्ती सेवा एकात्मीकरण लागू केले आहे. पोस्टमन मोबाईल अॅपच्या माध्यमातून वेगवान टपाल सेवा, रजिस्टर्ड टपाल, व्यावसायिक पार्सल इत्यादींच्या वास्तविक वेळेतील वितरण सेवा देखील सुरु केली आहे. सामान्य अथवा रजिस्टर्ड नसलेल्या पत्रांच्या वितरणाची परीक्षण अधिक सुधारण्यासाठी भारतीय टपाल विभाग  रजिस्टर्ड नसलेल्या बॅग तसेच पत्रांच्या खोक्यांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील मंजुरी सुरु केली आहे.

ई-वाणिज्य घटकाची जगभरात झालेल्या वाढीने पाकिटे आणि पार्सल उंच्या हस्तांतरण आणि वितरणात मोठा बदल घडविला आहे, त्याला अनुसरून भारतीय टपाल विभागाने देखील ई-वाणिज्य ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन पार्सलचे परिचालन आणि व्यवसाय यांसाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *