Reserve Bank of India hikes repo rate by half a percentage point
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात अर्धा टक्के वाढ
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात अर्धा टक्के वाढ, रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँक ज्या दराने व्यावसायिक बँकांना कर्ज देते तो दर, त्यात अर्धा टक्का वाढ करण्यात आली आहे. प्रचलित प्रतिकूल जागतिक वातावरण, देशांतर्गत आर्थिक व्यवहारातील लवचिकता, सुखावह नसलेला चलनवाढीचा उच्च स्तर लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक ने धोरणात्मक रेपो दर अर्ध्या टक्क्यानं वाढवून 5.4% इतका केला आहे.
दास म्हणाले की, २०२२-२३ मधे आर्थिक विकास वाढीचा दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे. इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष अनंत सिंघानिया यांनी रिझर्व्ह बँकेच्या मौद्रित स्थिती धोरणाबाबत बोलताना सांगितलं की, आरबीआयचा रेपो दर वाढीचा निर्णय संतुलित आणि विवेकपूर्ण आहे. यामुळे तरलता कायम राहिली असून, आरबीआयचा सध्याचा आर्थिक विकास वाढीचा अपेक्षित ७ पूर्णांक २ दशांश टक्के दर निर्णय जो जागतिक बाजारातल्या अस्थिर परिस्थिती, मंदीची भीती आणि युक्रेन युद्धाचा परिणाम लक्षात घेता अत्यंत सुदृढ आहे. हा निर्णय व्यवसाय आणि ग्राहकांसाठी न्यायपूर्ण असून, पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपर्यंत महागाई ६ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचं आरबीआयचं उद्दिष्टं असल्याचं सिंघानिया यांनी सांगितलं.
hadapsarinfomedia@gmail.com