भारतीय लष्कराकडून निवेदन.
आज 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या दुर्दैवी हवाई अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, संरक्षण कर्मचाऱ्यांच्या पत्नींच्या कल्याणासाठी असलेल्या संघटनेच्या (डीडब्लूडब्लूए) अध्यक्ष मधुलिका रावत आणि लष्कराचे इतर 11 कर्मचारी यांचा अकाली मृत्यू झाल्याबद्दल जनरल एम एम नरवणे आणि भारतीय लष्कराच्या सर्व श्रेणीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून अतीव दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते ज्यांनी भारतीय लष्कराच्या उच्च संरक्षण संघटनांमध्ये अतिशय महत्त्वाच्या दूरगामी सुधारणांचा प्रारंभ केला. देशी बनावटीच्या लष्करी सामग्रीच्या उत्पादनाला चालना देण्यामध्ये आणि भारताच्या संयुक्त थिएटर कमांडचा पाया घालण्यामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. त्यांनी दिलेला हा वारसा पुढे सुरू राहील आणि पुढील अनेक पिढ्या तो बळकट करतील.
संरक्षण कर्मचाऱ्यांच्या पत्नींच्या कल्याणासाठी असलेल्या संघटनेच्या (डीडब्लूडब्लूए) माजी अध्यक्ष आणि प्रेरणास्थान असलेल्या मधुलिका रावत यांची अनुपस्थिती सर्वांनाच हेलावून टाकेल.
त्याचप्रकारे सीडीएस आणि डीडब्लूडब्लूएच्या अध्यक्षांसोबत वेलिंग्टनला जात असलेल्या लष्कराच्या 11 कर्मचाऱ्यांची सर्वांनाच सदैव उणीव भासेल. त्यांनी सशस्त्र दलाच्या सर्वोत्तम परंपरांनुसार आपले कर्तव्य बजावले.