Indian Air Force’s five Rafale fighter jets to fly in ‘Vinash’, Grandest flypast to take place over Rajpath -Wing Commander Indranil Nandi
भारतीय वायुदलाची पाच राफेल लढाऊ विमानं ‘विनाश’ या हवाई प्रात्यक्षिक प्रकारात उड्डाण करणार – विंग कमांडर इंद्रनील नंदी.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली इथं राजपथावर होणाऱ्या संचालनाच्या वेळी भारतीय वायुदलाची पाच राफेल लढाऊ विमानं ‘विनाश’ या हवाई प्रात्यक्षिक प्रकारात उड्डाण करणार असल्याचं भारातीय वायुदलाच्या प्रवक्ता विंग कमांडर इंद्रनील नंदी यांनी म्हटलं आहे.
यावेळी भारतीय नौदलाची MiG-२९- K लढाऊ विमानं आणि P-८-I ही टेहळणी विमानं ‘वरुण’ या हवाई प्रात्यक्षिक प्रकारात उड्डाण करतील.
तसंच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त १७ जगुआर लढाऊ विमानं आकाशामध्ये ७५ या आकड्याच्या आकारात उडतील. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी भव्य हवाई प्रात्यक्षिकं सादर होणार असून भारतीय वायुदल, लष्कर आणि नौदलाची एकूण ७५ विविध प्रकारची विमानं यात सहभागी होणार असल्याचं विंग कमांडर नंदी यांनी सांगितलं.