Pre-training program for recruitment to the post of officer in the Indian Armed Forces
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम
- निःशुल्क प्रशिक्षण आणि सुविधा
- मुलाखतीसाठी आवश्यक माहिती
पुणे : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी २० जानेवारी ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे यांनी दिली आहे.
निःशुल्क प्रशिक्षण आणि सुविधा
या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवेशासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराने लोकसेवा आयोग, नवी दिल्ली मार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेला असावा.
मुलाखतीसाठी आवश्यक माहिती
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी १५ जानेवारी २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in संकेतस्थळावरून सीडीएस-६४ प्रशिक्षणाकरिता अर्ज करून संबंधित प्रवेशपत्र आणि परिशिष्टांसह तीन प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहिती आणि संपर्क साधा
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी खालील संपर्क माध्यमांद्वारे संपर्क साधावा:
ईमेल: training.pctonashik@gmail.com
दूरध्वनी क्रमांक: ०२५३-२४५१०३२
व्हॉट्सअॅप क्रमांक: ९१५६०७३३०६ (प्रवेशपत्रासाठी)
संपर्क कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे करता येईल. इच्छुक उमेदवारांनी ही संधी साधावी, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम”