भारतीय हॉकीच्या वैभवाचे पुनरुज्जीवन.

Indian men's hockey team rewrote history when it scored a sweet victory at the Tokyo Olympics 2020

भारतीय हॉकीच्या वैभवाचे पुनरुज्जीवन.

ऑलिम्पिकमधील पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय हॉकी संघाला 41 वर्षे लागली. टोक्यो ऑलिम्पिक 2020 मध्ये दृढ निर्धार करुन ऐतिहासिक विजय संपादन करत भारतीय पुरुष हॉकी संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला. टोक्यो ऑलिम्पिकमधील कांस्य पदक हे केवळ पदक नव्हते, तर ते करोडो देशवासीयांच्या आशा आणि स्वप्नांचे द्योतक होते. Indian men's hockey team rewrote history when it scored a sweet victory at the Tokyo Olympics 2020

एक काळ असा होता, जेव्हा जागतिक हॉकीवर भारताने अक्षरशः राज्य केले होते. ऑलिंपिकमध्ये आठ वेळा सुवर्ण विजेतेपद मिळवणारा भारत गेल्या चार दशकांत बदललेल्या आधुनिक हॉकीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरला. ॲस्ट्रो टर्फचे आगमन आणि खेळाच्या नियमांमध्ये अचानक झालेले बदल यामुळे जागतिक हॉकी स्पर्धांमध्ये संघर्ष करताना भारतीय हॉकीला विजयपदाला गवसणी घालण्यात अपयश आले.

या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “हा आत्मविश्वासयुक्त असा भारत, हा एक नवीन भारत आहे.  हा एक असा ऐतिहासिक दिवस आहे, जो प्रत्येक भारतीयाच्या सदैव स्मरणात राहील. कांस्य पदक मायदेशी आणल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन!”. यावेळी झालेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान संघातील सर्व सदस्यांनी त्यांची स्वाक्षरी केलेली एक हॉकी स्टिक पंतप्रधानांना भेटीदाखल दिली.

आता लाखो इच्छुक हॉकीपटूंना नवोन्मेष  दणारी, ही हाॅकीस्टिक पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ऑनलाइन लिलाव वस्तूंमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. ज्यांना ही हॉकीस्टीक मिळवायची आहे ते ऑनलाइन बिडिंग साइट www.pmmementos.gov.in/ मध्ये सहभागी होऊ शकतत. 17 सप्टेंबरपासून सुरू झालेला हा ऑनलाइन लिलाव दिनांक 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *