भारत – फ्रांस दरम्यानचा सहाव्या संयुक्त लष्करी सराव ‘ शक्ती – 2021’ ची फ्रांस येथे सांगता

“Ex SHAKTI- 2021” culminated on 25 November 2021

भारत – फ्रांस दरम्यानचा सहाव्या संयुक्त लष्करी सराव ‘ शक्ती – 2021’ ची फ्रांस येथे सांगता.“Ex SHAKTI- 2021” culminated on 25 November 2021

भारत आणि फ्रांस दरम्यान दर दोन वर्षांनी होणारा संयुक्त लष्करी सराव ‘एक्स शक्ती – 2021’ चं हे सहावं वर्ष असून 25 नोव्हेंबर 2021 रोजी फ्रांस इथं या सरावाची सांगता झाली. बारा दिवसांच्या खडतर संयुक्त लष्करी प्रशिक्षणात दोन्ही देशांच्या सैनिकांनी आपली लढाऊ शक्ती आणि कृत्रिमरीत्या तयार केलेल्या वातावरणात घुसखोरी/दहशतवाद विरोधी मोहिमांचा अभ्यास केला. संयुक्त राष्ट्रांच्या नियमावलीनुसार झालेल्या या संयुक्त युद्धाभ्यासात दोन्ही देशांच्या सैनिकांना दहशतवाद विरोधी कारवायांसाठी प्रशिक्षित होण्याची संधी मिळते.

हा युद्धाभ्यास दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात आला. यात युद्धजन्य परिस्थितीसाठी मानसिकता तयार करणे आणि दहशतवाद विरोधी मोहिमांसाठी विशेष कूटनीतिक प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणाची सांगता निमशहरी वातावरणातल्या प्रशिक्षणाने करण्यात आली. या प्रशिक्षणाची सांगता, दोन्ही सैन्य तुकड्यांनी यात आपल्या सर्वोत्तम पद्धती आणि अनुभवांची देवाणघेवाण केली. या प्रशिक्षणा दरम्यान तसंच यावेळी झालेल्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान झालेल्या संवाद आणि देवघेवीतून दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये  सौहार्दाची भावना विकसित झाली.

दोन्ही सैन्य तुकड्यांची या संयुक्त सरावाच्या उपलब्धीबाबतत संपूर्ण समाधान व्यक्त केलं. या सरावाच्या दर्जाबाबतही सैन्य समाधानी होते. दहशतवाद मुक्त जगाची निर्मिती करण्याच्या संकल्पासाठी हा युद्धाभ्यास एक महत्वाचा टप्पा आहे. दोन्ही देशांच्या लष्करी राजनैतिक संबंधांना या युद्धभ्यासामुळे निश्चितच नवे आयाम प्राप्त झाले आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *