भारत हा यापुढील काळात गुंतवणूकीसाठी जगातील अत्यंत महत्त्वाचा देश असेल – केंद्रीय मंत्री पीयूष गोयल.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या सात वर्षांमध्ये विक्रमी प्रमाणात थेट परदेशी गुंतवणूक आणली आणि सलग सात वर्षे यातील प्रत्येक वर्षाने गेल्या वर्षीचा विक्रम मोडीत काढला- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल.
नवी दिल्ली: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, नुकत्याच प्रसिध्द झालेल्या सीआयआय- अर्नेस्ट आणि यंग च्या अहवालानुसार भारत हा यापुढील काळात गुंतवणूकीसाठी जगातील अत्यंत महत्त्वाचा देश असेल.
“आपल्या देशात 2025 पर्यंत 120 ते 160 अब्ज अमेरिकी डॉलर्सची वार्षिक थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आहे. गेल्या सात वर्षांमध्ये विक्रमी प्रमाणात थेट परदेशी गुंतवणूक खेचून आणली आणि सलग सात वर्षे यातील प्रत्येक वर्षाने गेल्या वर्षीचा विक्रम मोडीत काढला. आणि आता होत असलेल्या मुख्य संरचनात्मक सुधारणा पाहता हा काळ कायम राहील अशी अशा आहे, आपल्याकडे ऐकण्याची इच्छा असलेले आणि बदलत्या काळात बदल घडवून आणण्याची इच्छा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्रीय नेते आहेत,” असे ते म्हणाले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या संदर्भात सीआयआय राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या पर्वप्रसंगी ते आज उपस्थितांना संबोधित करत होते.
केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले कि जागतिक बाजारातील भावना “भारत का?” पासून “भारत का नाही?” अशा बदलल्या आहे आणि आज ‘आपण भारतात असलेच पाहिजे!” पर्यंत हा प्रवास येऊन थांबला आहे. “जगात कुठेही असतील त्याहून जास्त यशोगाथा आज भारतात आहेत, आपल्याकडे 71 युनिकॉर्न आहेत. ऑक्टोबर 2021 साठीच्या नौकरी जॉबस्पीक निर्देशांकानुसार गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापेक्षा रोजगार संधींमध्ये 43% वाढ झाली आहे. आपला उत्पादनविषयक पीएमआय उच्च पातळीवर आहे आणि सेवाविषयक पीएमआय या दशकातील सर्वाधिक उंचीवर आहे,” ते म्हणाले.
गोयल म्हणाले कि सरकारने गुंतवणूक वातावरण सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या धोरणविषयक आणि व्यापारविषयक सुधारणा केल्या आहेत. “सर्वात नजीकचा आणि जवळचा निर्णय म्हणजे एअर इंडियाचे खासगीकरण, ज्यात टाटा समूहाने यशस्वी रीतीने बोली जिंकली तसेच अत्यंत दुर्दैवी अशा पूर्वलक्षी कराराचे निर्मुलन जे मला वाटते आपल्याला अनेक वर्षे गुंतवणुकीच्या वातावरणापासून दूर ठेवत होते, उत्खनन क्षेत्रातील, कोळसा क्षेत्रातील काही सुधारणा, आपण उर्जा क्षेत्रात ज्या सुधारणा आणू पाहत आहोत, भारतातील मोठी नवीकरणीय उर्जा विकास गाथा, या सर्व गोष्टी, मला वाटते, आपल्याला अधिक विस्तृत भविष्याकडे पाहण्यास प्रोत्साहन देतात,” असे त्यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांसाठी गरजेच्या असणाऱ्या सर्व प्रकारच्या मंजुऱ्या आणि परवानग्या एकाच ठिकाणी मिळू शकणाऱ्या राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे असे गोयल यांनी सांगितले. “या पोर्टलवर केंद्र सरकारचे 18 विभाग आणि 9 राज्य सरकारे यांच्या परवानग्यांसाठी कार्य करते. डिसेंबर महिन्यापर्यंत केंद्र सरकारचे आणखी 14 विभाग आणि 5 राज्यांची सेवा या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे.”, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले कि भारताकडे बहुराष्ट्रीय मंडळांसाठी आवश्यक असणारे सर्व योग्य घटक उपलब्ध आहेत आणि त्यामुळे जगातील पातळीवर या मंडळांना अधिक स्पर्धात्मक होण्यात मदत होईल. “वैविध्यपूर्ण व्यापार चित्र, कायद्याची अंमलबजावणी आणि पारदर्शक प्रणाली, कुशल कामगारवर्ग आणि कामगारांवर होणारा कमी खर्च, बंधनकारक तंत्रज्ञान हस्तांतरण नसणे” हे सर्व अनुकूल घटक भारताकडे आहेत असे ते म्हणाले.
भारतातील बहुराष्ट्रीय मंडळांना ब्रांड इंडिया जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच भारताची संस्कृती, दर्जा आणि मूल्ये यांचे दूत होण्यासाठी प्रोत्साहन देऊन गोयल म्हणाले की ही मंडळे भारताच्या विकास गाथेचा अविभाज्य भाग असून त्यांचे यातील योगदान प्रचंड आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या “सुधारणा घडवून आणण्यासाठी उत्तम आणि हुशार प्रशासनाची गरज असते. भारत प्रशासनाचे नवे धडे कसे गिरवत आहे याचे संपूर्ण जग साक्षीदार आहे” या विधानाचा दाखला देत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उद्योजकांना भारताच्या नव्याने उलगडत्या विकासगाथेचा भाग होण्यासाठी आमंत्रित केले.