मंगळवारी सकाळी ११ वाजता सादर होणार अर्थसंकल्प.

The budget will be presented on Tuesday at 11 am.

मंगळवारी सकाळी ११ वाजता सादर होणार अर्थसंकल्प.Finance Minister Nirmal Sitharaman

नवी दिल्ली: आगामी आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत मांडणार आहेत.

त्याआधी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक होईल. या बैठकीत अर्थसंकल्पाला मान्यता मिळाली, की नंतर, अर्थमंत्री तो लोकसभेत सादर करतील.

अर्थसंकल्प लोकसभेत सादर झाल्यावर, तो राज्यसभेतही मांडला जाणार आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाचा अर्थसंकल्पदेखील डिजीटल स्वरुपात मांडला जाणार आहे.

संसदेत अर्थसंकल्प सादर केला जात असतानाचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन होणार आहे. सकाळी दहा वाजून वीस मिनिटांपासून दुपारी दोन वाजेपर्यंत तसंच दुपारी तीन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आकाशवाणीवरुन हिंदी आणि इंग्रजीतून अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. युनीयन बजेट अॅपवरही हा अर्थसंकल्प पाहायला मिळेल.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *