Organization of special camps on holidays in Cantonment Vidhan Sabha constituencies for voter registration
मतदार नोंदणीकरिता कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात सुट्टीच्या दिवशी विशेष शिबीरांचे आयोजन
४ व ५ नोव्हेंबर तसेच २५ व २६ नोव्हेंबर या दिवशी शिबीरांचे आयोजन
पुणे : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत २१४ कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात ४ व ५ नोव्हेंबर व २५ व २६ नोव्हेंबर या शनिवार व रविवारच्या शासकीय सुट्टीच्या दिवशी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम सुरू असून हा कार्यक्रम ९ डिसेंबरपर्यंत सरु राहणार आहे. या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नवीन मतदार नोंदणीचे तसेच मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलाची दुरुस्ती अथवा वगळणीचे अर्ज मागविण्यात येत आहेत.
४ व ५ नोव्हेंबर तसेच २५ व २६ नोव्हेंबर या दिवशी पुणे कॅन्टोमेंन्ट मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात अधिकाधिक नागरिकांनी त्यांची मतदार नोंदणी अथवा दुरूस्ती करुन घेण्यासाठी उपस्थित रहावे.
या विशेष शिबीरात नवमतदार, महिला, दिव्यांग, भटके विमुक्त जमातीतील घर नसलेले, तृतीयपंथी मतदार यांचीदेखील नाव नोंदणी करण्यात येणार आहे. मतदार संघातील जास्तीत जास्त नागरीकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे कॅन्टोमेंन्ट विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
वंचित घटकातील नागरिकांच्या मतदार नोंदणीकरिता समन्वय अधिकाऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करावे
One Comment on “मतदार नोंदणीकरिता सुट्टीच्या दिवशी विशेष शिबीरांचे आयोजन”