मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा

Election Commision of India

Citizens should participate in special brief revision program of voter lists

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार

१ जानेवारी २०२३ रोजी नोंदणी न केलेले पात्र मतदार आणि १ जानेवारी २०२४ मतदार नोंदणीसाठी संभाव्य पात्र मतदारांची नोंदणी

पुणे : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि नवमतदारांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.State Election Commissioner. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. मतदार यादी किंवा मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे. आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे. अस्पष्ट अंधुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडुन योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येणार आहे.

१ जानेवारी २०२३ रोजी नोंदणी न केलेले पात्र मतदार आणि १ जानेवारी २०२४ मतदार नोंदणीसाठी संभाव्य पात्र मतदारांची नोंदणी करण्यात येईल. एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरित मतदारांच्या नोंदी वगळणे व मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती करण्यात येणार आहे.


हे ही अवश्य वाचा
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीवर भर द्या- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
ईव्हीएममधील प्रक्रिया पारदर्शक असून त्यामध्ये कोणताही प्रकारचा मानवी हस्तक्षेप करता येत नाही

आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणीही मतदार मतदानापासुन वंचित राहु नये यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ आहे अगर कसे याबाबत नागरिकांनी पडताळणी करून घ्यावी. एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदाराचे नाव समाविष्ट असल्यास त्यांनी एक नाव कायम ठेवून इतर ठिकाणची नावे कमी करण्यासाठी नमुना ७ चा अर्ज भरुन मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जमा करावा. मतदारांचे नाव चुकीने वगळण्यात आले असल्यास त्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रासह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय येथे नमुना ६ चा अर्ज जमा करावा, असे आवाहनही डॉ.देशमुख यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *