मराठा प्रवर्गातील उमेदवारांकरीता ‘सारथी’ अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (Sarathi) Hadapsar Latest News, Hadapsar News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

Skill Development Program under ‘Sarathi’ for Maratha category candidates

मराठा प्रवर्गातील उमेदवारांकरीता ‘सारथी’ अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम

२०,००० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणअंती रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणारछत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) 
Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (Sarathi) Hadapsar Latest News, Hadapsar News, Hadapsar News
हडपसर मराठी बातम्या

मुंबई: छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.

‘सारथी’ च्या लक्षीत गटातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या प्रवर्गाच्या एकूण २०,००० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणअंती रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

कौशल्य विकास सोसायटीच्या संकेतस्थळावर कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदविण्याकरिता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi या लिंकवर भेट देऊन नोंदणी करावी.

या उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यामधून स्किल इंडिया पोर्टलवरील विविध सेक्टरमधील अभ्यासक्रमाकरिता ५ स्टार, ४ स्टार व ३ स्टार ट्रेनिंग सेंटर (TP-TC) यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत विहीत प्रक्रियेचा अवलंब करून प्रशिक्षण राबविले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर, १७५ श्रेयस चेंबर, पहिला मजला, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी ०२२-२२६२६४४० यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तपासणी मोहीम राबविणार
Spread the love

2 Comments on “मराठा प्रवर्गातील उमेदवारांकरीता ‘सारथी’ अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *