महापालिकेच्या माध्यमातून पुण्यात पादचारी दिन साजरा झाला.
दि.११/१२/२०२१ रोजी पादचारी दिनानिमित्त, पुणे शहरात विविध ठिकाणी पुणे महानगरपालिका च्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील विविध भागात मा.मुरलीधर मोहोळ, महापौर पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पादचार्यांसाठी साठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी मा.महापौर श्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की पादचारी राजा असला तरी प्रत्यक्षात पादचारी यांची अवस्था बिकट आहे. पण आपल्या पुण्याच्या मार्गदर्शक तत्वांमुळे सुधारणा होऊ लागल्या आहेत .
पादचारी यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि ह्या सुधारणांना वेग देण्यासाठी पादचारी दिन संपूर्ण देशात साजरा करण्यात यावा .
पुणे भारतातील पहिल शहर आहे की या ठिकाणी असा उपक्रम राबविण्यात आला. अन्य शहरे देखील पुण्याचे अनुकरण करतील अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त करूया