News of shortage of Covid vaccine in Maharashtra is wrong, explanation from Center.
महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक लसींचा तुटवडा असल्याचं वृत्त चूकीचं, केंद्राकडून स्पष्टीकरण.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक लसींचा तुटवडा असल्याचं प्रसारमाध्यमांमधलं वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रात कोवॅक्सिनच्या न वापरलेल्या २४ लाख मात्रा शिल्लक आहेत, त्याशिवाय आज ६ लाख ३५ हजार अतिरिक्त मात्र प्राप्त झाल्या आहेत, असं स्पष्टीकरण मंत्रालयानं दिलं आहे.
१५ ते १८ वयोगटातल्या लाभार्थ्यांना देण्यासाठी तसंच वर्धक मात्रा देण्यासाठी महाराष्ट्रात दैनंदिन सरासरी २ लाख ९४ हजार मात्रांची आवश्यकता भासते असं कोवीन ऍप वरून लक्षात येतं . त्या दृष्टीने पाहिल्यास राज्याकडे कोवॅक्सिनच्या पुढील दहा दिवस पुरतील इतक्या मात्रा आहेत, असं मंत्रालयानं कळवलं आहे.