महाराष्ट्रात 9,170 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण मुंबईत.

CORONA-MAHARASHTRA-MAP हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

महाराष्ट्रात 9,170 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण मुंबईत.

राज्य सरकारने नागरिकांना कोविड नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला आहे किंवा कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागेल.CORONA-MAHARASHTRA-MAP-

मुंबई : ओमिक्रॉन प्रकारासह महाराष्ट्रात कोविड 19 प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. राज्यात काल 9170 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली ज्यामध्ये सहा ओमिक्रॉन प्रकारांचा समावेश असून ओमिक्रॉन प्रकारातील एकूण रुग्णांची संख्या 460 वर पोहोचली आहे.

त्यामुळे राज्यातल्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ३२ हजार २२५ वर पोचली आहे. यापैकी सर्वाधिक २२ हजार ३३४ रुग्ण मुंबईत आहेत. काल १ हजार ४४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत ६६ लाख ८७ हजार ९९१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६५ लाख १० हजार ५४१ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४१ हजार ५३३ रुग्ण दगावले.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड-19 चे रुग्ण वाढत राहिल्यास राज्यात कडक निर्बंध घालण्याचा इशारा दिला.

राज्यात कोरोनामुक्तीचा दर घसरुन तो आता ९७ पूर्णांक ३५ शतांश टक्के झाला आहे, तर मृत्यूदर २ पूर्णांक ११ शतांश टक्के आहे. राज्यात काल ओमायक्रॉन संसर्गाचे ६ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ३ पुणे ग्रामीण, २ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तर १ रुग्ण पुणे महानगर पालिका क्षेत्रातला आहे.

राज्यात आतापर्यंत ४६० ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १८० रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे, असं आरोग्य विभागानं कळवलं आहे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *