महाराष्ट्राला ५०० मेट्रीक टन वैद्यकीय प्राणवायुची गरज लागल्यास, पुन्हा टाळेबंदी करावी लागेल- राजेश टोपे.
जालना : ओमायक्रॉनचा प्रसार असाच वाढत राहिला आणि महाराष्ट्राला ५०० मेट्रीक टन वैद्यकीय प्राणवायुची गरज लागली, तर राज्यात पुन्हा टाळेबंदी करावी लागेल, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल जालना इथं बोलत होते.
राज्यात ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली तरच लॉकडाऊन केला जाईल, अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली होती,मात्र आता वर आणावी लागेल आणि त्यानंतरच लॉकडाऊन केला जाईल, असंही टोपे म्हणाले. नागरिकांनी निर्बंधाचं पालन करून काळजी घेण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे.
यापुढे राज्यात परीक्षा OMR पद्धतीने होणार नसून, ती घेण्यासाठी कोणत्याही खाजगी संस्थेकडे काम सोपवले जाणार नसल्याची देखील माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.