महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि राज्यातल्या ९ शैक्षणिक संस्था यांच्यात सामंजस्य करार.

Memorandum of Understanding between Maharashtra State Teacher Development Institute and 9 Educational Institutions in the State.

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि राज्यातल्या ९ शैक्षणिक संस्था यांच्यात सामंजस्य करार.Technical Education Minister Uday Samant

मुंबई: कोविड-१९ मुळे सुरु झालेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि राज्यातल्या ९ शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृह इथं सामंजस्य करार करण्यात आले.

देशाच्या विकासाला गती देण्यात मोठी भूमिका निभावणाऱ्या युवा पिढीचे मानसिक आरोग्य संभाळणं गरजेचं आहे, त्यामुळे या शैक्षणिक संस्थांनी बदललेली जीवनशैली, विद्यार्थ्यांचे करिअर, मानसिक आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, आदींविषयी मार्गदर्शन करावं असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं.

सामंजस्य करारामध्ये आयसीटी मुंबई, डॉ.आनंद नाडकर्णी यांची आयपीएच, डॉ.हमीद दाभोळकर यांची परिवर्तन ट्रस्ट, एसएनडीटी विद्यापीठ, सेंट झेविअर्स कॉलेज, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, सर जे जे स्कूल ऑफ आर्ट, डेक्कन इस्टिट्यूट, पुणे आदी संस्थांचा समावेश आहे.

या विविध संस्थांच्या माध्यमातून मानवी जीवनातील कला, संस्कृती, पुरात्तत्व, माहिती तंत्रज्ञान, स्त्री पुरुष समानता, दिव्यांगांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन अशा विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *