If the three parties in Mahavikas Aghadi fight together, BJP’s defeat is possible
महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपाचा पराभव शक्य- अशोक चव्हाण
मुंबई : आघाडी करुन लढताना स्थानिक पातळीवर समन्वय महत्वाचा असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत काँग्रेसच्या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर बातमीदारांशी बोलत होते.
या बैठकीसाठी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते हजर होते. यातच संबंधित लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, आजी माजी खासदार, आमदार, जिल्ह्याध्यक्ष, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील काॅंग्रेसचे उमेदवारी, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष यांना बोलावले जाणार आहे.
राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच स्थानिक मुद्द्यांना महत्व देण्याची गरज आहे. त्यामुळे निवडणुकीआधी राज्यातल्या ४८ मतदारसंघातली स्थानिक पातळीवरची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न या दोन दिवसीय बैठकीत केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपाचा पराभव करणं कठीण नाही. जागा वाटपावरून आघाडीवर काही परिणाम होणार नाही. चर्चेअंती महाविकास आघाडीचा जो उमेदवार ठरेल त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. असं चव्हाण म्हणाले. देशभर भाजपाविरोधी वातावरण आहे म्हणूनच पराभवाच्या भितीनं भाजपा सरकार राज्यातील महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका घेत नाही, अशी टीका त्यांनी केली.
आगामी निवडणुकीत मोठा विजय कसा संपदान करायचा यावर या बैठकीत विचारमंथन केलं जाणार आहे. काँग्रेस पक्ष सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या जागा वाटपावर काही परिणाम होणार नाही. काँग्रेस पक्षाची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद आहे. काँग्रेस पक्ष सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या जागा वाटपावर काही परिणाम होणार नाही. भाजपाचा पराभव करणं हेच आमचं लक्ष्य असून या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत पुढची रणनिती निश्चित केली जाईल, असं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला. ३० मतदारसंघात भाजपाच्या महत्वाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. देशभर काँग्रेस हाच पर्याय असून भाजपाविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त ४८ जागा असणारे राज्य आहे. या प्रत्येक जागेवर विजयी होण्यासाठी काय करता येईल याची व्यूहरचना या बैठकीत ठरवली जाणार आहे. मविआचे घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट पक्षालाही जागा वाटपावेळी विचारात घेतले जाईल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com