“माझ्या शब्दात शरद पवार”, या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.

“माझ्या शब्दात शरद पवार”, या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे आयोजित, ‘माझ्या शब्दात शरद पवार’ राज्यस्तरीय लेख व निबंध स्पर्धा अंतर्गत घेण्यात आली होती.The book "Sharad Pawar in my words" was released.

सदर स्पर्धेतील निवडक व बक्षीस पात्र असलेल्या ३२ निबंध व लेखाचे संकलन करून “माझ्या शब्दात शरद पवार” या पुस्तकाचे मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार भाषणामध्ये भाषांतर करून पुस्तकाची निर्मिती करण्यात आली.

हा पुस्तक प्रकाशन सोहळा आदरणीय पद्मविभूषण खा.शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत नेहरू सेंटर वरळी मुबंई येथे संपन्न झाला. सदर प्रसंगी पवार साहेबांना आगळे वेगळे स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले.

प्रकाशन सोहळ्या नंतर विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.

त्या वेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना.अजित दादा पवार , प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री मा. जयंतराव पाटील, खा.सुप्रिया ताई सुळे , अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.छगनराव भुजबळ , गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील, अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री ना.जितेंद्र आव्हाड, सामजिक व न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे व शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया , शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार बंड ,संदीप राक्षे, विवेक थिटे , अच्युत कुलकर्णी, सुशील बोरडे , प्रा.डॉ.सुशील गावंडे , नितिन गावंडे , आदी उपस्थित होते

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *