मार्च २०२३ मधे घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

Maharashtra SSC & HSC Board हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

The SSC Board has announced the results of the class 10th examination held in March 2023

राज्य शिक्षण मंडळानं मार्च २०२३ मधे घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५ पूर्णांक ८७ शतांश, बारावीनंतर दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च २०२३ मधे घेतलेल्या, माध्यमिक शालांत, म्हणजे इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकाल जाहीर केला. त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण ९३ पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे.Maharashtra SSC & HSC Board हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

या परीक्षेला राज्यभरातून १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीनंतर दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.

मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५ पूर्णांक ८७ शतांश, तर मुलांची टक्केवारी ९२ पूर्णांक ५ शतांश इतकी आहे. यंदाही कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के इतका आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी, ९२ पूर्णांक ५ शतांश टक्के आहे.

विभागवार निकाल पुढील प्रमाणे

पुणे ९५.६४, नागपूर ९२.०५, औरंगाबाद ९३.२३, मुंबई ९३.६६, कोल्हापूर ९६.७३,अमरावती ९३.२२, नाशिक ९२.२२, लातूर ९२.६७, कोकण ९८.११

विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. खालील अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

mahahsscboard.in वर ऑनलाईन पाहता येईल. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल उपलब्ध असणार आहे. गुणपत्रिका १४ जून रोजी दुपारी ३ वाजता शाळेत मिळणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *