Big drop in Mumbai corona patient population.
मुंबईच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट.
मुंबई : मुंबईत सतत तीन दिवस कोरोनाची रूग्ण संख्या २० हजाराच्या आसपास आढळत होती. मात्र आता ही रूग्ण संख्या घटू लागली आहे. मुंबईत काल ११ हजार ६४७ नवे रुग्ण आढळले. तर त्यापेक्षा जास्त म्हणजे १४ हजार ९८० रुग्ण बरे होऊन घरी गेले.
काल आढळलेल्या रुग्णांपैकी ९ हजार ६६७, म्हणजे ८३ टक्के रुग्णांमधे लक्षणं नाहीत. ८५१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ८७ टक्के असून, कोरोना रुग्णवाढीचा दर १ पूर्णांक ८७ शतांश टक्के असा आहे.
रुग्णदुपटीचा कालावधी ३६ दिवस असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.